दिव्यांग सर्व्हेक्षणःऑनलाईन ॲपद्वारे घर बसल्या नोंदणी शक्य; दि.१ ते १० जानेवारी विशेष अभियान

 


अकोला दि.३१(जिमाका)-जिल्ह्यात  सुरु असलेल्या दिव्यांग सर्व्हेक्षणासाठी ‘दिव्यांग सर्व्हे अकोला’ हे ऑनलाईन ॲप तयार करण्यात आले असून त्याद्वारे दिव्यांग व्यक्ती घरबसल्या आपली नोंदणी करु शकणार आहे. या नोंदणीसाठी शनिवार दि.१ ते सोमवार दि.१० जानेवारी २०२२ या दरम्यान विशेष नोंदणी अभियान राबविले जाणार आहे. या कालावधीत जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तिंनी आपापल्या ॲन्ड्रॉईड फोनद्वारे नोंदणी करावी,असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे.

 दिव्यांग सर्व्हेक्षण अकोला हे ॲप प्ले स्टोअर वर उपलब्ध असून तेथून ते आपल्या ॲन्ड्रॉईड फोन मध्ये डाऊन लोड करावे. दिव्यांग व्यक्तीकडे मोबाईल नसल्यास कुटुंबातील  वा अन्य कुणाच्याही फोनवरुन ते करुन घेता येईल. त्यानंतर आपला मोबाईल क्रमांक टाकून रजिस्ट्रेशन करावे.  या ॲपवर आपले आधार कार्ड स्कॅन  करुन अपलोड करावे. त्यानंतर आवश्यक कागदपत्रे या कॉलम मध्ये  दिलेली कागदपत्रे ‘असल्यास’ ती आपल्या स्वाक्षरीसहित अपलोड करावे (अनिवार्य नाही).  त्यानंतर तिसऱ्या स्टेप मध्ये काही प्रश्नावलीची उत्तरे द्यावयाची आहेत. ही संपूर्ण माहिती अपलोड केल्यावर  टोकन क्रमांक मिळेल आणि आपले सर्व्हेक्षण पूर्ण होईल.

 तरी दिव्यांग व्यक्तिंनी आपल्या स्वतःच्या स्मार्ट फोनद्वारे अथवा कुटुंबातील व्यक्ती, मित्र यांच्या मदतीने हे ॲप डाऊनलोड करुन सर्व्हेक्षणात सहभागी व्हावे,असे आवाहन करण्यात आले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ