पातुर येथील लाभक्षेत्र व बुडीत क्षेत्रावरील जमिन खरेदी विक्री व्यवहारावरील निर्बंधात सुट

 अकोला, दि.१७(जिमाका)-  पातुर लघु पाटबंधारे प्रकल्पातील चिंचखेड व सावरखेड येथील बुडीत क्षेत्र ३२.४० हे.आर तसेच चिंचखेड, बोडखा व पातुर येथील लाभक्षेत्र २९० हेक्टर आर क्षेत्रातील जमीनीच्या हस्तांतरण, पोटविभागणी, विभाजन, स्थानांतरण व खरेदी विक्रीवर लागू असलेले निर्बंध उठविण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी  निर्गमित केले आहेत.

या संदर्भात कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग यांनी प्रमाणित केले आहे की,  या प्रकल्पाचे भूसंपादन तथा पुनर्वसनाचे काम पूर्ण झाले आहे. तसेच या प्रकल्पासाठी आणखी खाजगी जमीन  संपादन करण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे जमिनीच्या खरेदी विक्री हस्तांतरण व्यवहारावरिल निर्बंध उठविण्याट यावे,असा प्रस्तावही सादर केला होता. त्यानुसार ह्या गावाच्या परिमंडळातील जमिनीच्या हस्तांतरण, पोटविभागणी, विभाजन, स्थानांतरण व खरेदी विक्रीवर लागू असलेले निर्बंध भुसंपादन अधिकारी यांचेकडे सुरु असलेल्या प्रकल्पा व्यतिरिक्त लाभक्षेत्रातील जमीनीचे खरेदी विक्री व्यवहारावरील निर्बंध उठविण्याचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्गमित केले आहे.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ