12 ते 17 डिसेंबर दरम्यान राज्यस्तरीय महारोजगार मेळावा

अकोला,दि.9(जिमाका)- जिल्‍हा कौशल्‍य विकास, रोजगार मार्गदर्शन केंद्र उद्योजकता विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील उमेदवारांना विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हावी याकरीता दि.12 ते 17 डिसेंबर दरम्यान ऑनलाईन राज्यस्तरीय महारोजगार मेळाव्‍याचेआयोजन करण्यात आले आहे. या ऑनलाईन मेळाव्यात जास्तीत जास्त उमेदवारांनी शैक्षणीक पात्रतेच्या आधारे ऑनलाईन नोंदणी करुन सहभागी व्हावे,  असे आवाहन जिल्‍हा कौशल्‍य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त द.ल. ठाकरे यांनी केले आहे.

कोविड संसर्गाचा प्रादुर्भावामुळे उद्योग व्यवसायावर विपरीत परिणाम झाला. सद्या कोविड संसर्गाचा प्रभावी कमी झाला असून जिल्ह्यातील व्यवसाय व उद्योग पुन्हा सुरु झाले आहेत. त्यामुळे रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध व्हावे याकरीता राज्यस्तरीय महारोजगार मेळाव्‍याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात सहभागी होण्याकरीता सर्वसाधारणपणे नववी पास, दहावी, बारावी, पदवी, आय.टी.आय., डिप्लोमा तसेच बी.. इतर व्यावसायिक शैक्षणिक पात्रतेच्या रिक्तपदांकरीता ऑनलाईन नोंदणी करावी. या मेळाव्यात विविध क्षेत्रातील साधारणत: किमान 25 हजार रिक्तपदे उमेदवारांसाठी उपलब्ध राहिल. या मेळाव्यात सहभागी होण्याकरीता कौशल्‍य विकास, रोजगार  व उद्योजकता विभागाच्‍या www.mahaswayam.gov.in या संकेतस्‍थळावर नांव  नोंदणी केलेल्‍या युवकयुवती उमेदवारांनी आपल्‍या सेवायोजन कार्डचा युझर आयडी व पासवर्डचा वापर करुन आपल्‍या लॉगीन मधुन ऑनलाईन अप्‍लॉय करु शकतात. ज्‍या उमदेवारांनी सेवायोजन कार्ड नोंदणी केलेली नाही त्‍यांनी संकेतस्‍थळावर तात्‍काळ नोंदणी करुन ऑनलाईन अप्‍लॉय करावे. ऑनलाईन अप्‍लॉय केलेल्‍या उमेदवारांच्‍या कंपनी, उद्योजकएच.आर.प्रतिनिधी यांचे कडून ऑनलाईन मुलाखती घेऊन निवड प्रक्रीया राबवितील.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ