कोविडः आरटीपीसीआर ‘दोन’ तर रॅपिड ॲन्टीजेन ‘एक’ पॉझिटीव्ह

 


अकोला दि.28(जिमाका)-आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 372 अहवाल प्राप्त झाले. त्यात दोघांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

 दरम्यान काल (दि.27) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 57912(43299+14436+177) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर दोन + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी एक = एकूण पॉझिटीव्ह तीन.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 343047 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 339391 फेरतपासणीचे 402 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 3254 नमुने होते. आजपर्यंत एकूण 343047 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 299748आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.  

दोनपॉझिटीव्ह

आज  दिवसभरात दोघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, हे दोघे पुरुष रुग्ण असून मनपा क्षेत्रातील रहिवासी आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.

‘नऊ’जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 57912(43299+14436+177) आहे. त्यात 1142  मृत झाले आहेत. तर 56761 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत नऊ जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे. 

रॅपिड ॲन्टीजेन चाचण्याः 279 चाचण्यात ‘एक’पॉझिटीव्ह

 कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.27) दिवसभरात झालेल्या 279 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली. 

       काल दिवसभरात अकोट येथे 11, तेल्हारा येथे 31, मुर्तिजापूर येथे तीन, अकोला महानगरपालिका क्षेत्रात 168, जिल्हा आरोग्य कर्मचाऱ्यांचे 23, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 41, तर हेगडेवार लॅब येथे दोन चाचण्या झाल्या,अशा एकूण 279 चाचण्यात हेडगेवार लॅब येथे  एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला,  असे जिल्हा रुग्णालयाने कळविले आहे.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ