ग्रामपंचायत पोटनिवडणूक २०२१: जात वैधता पडताळणीसाठी हमी पत्र सादर करण्यास दि.७ पर्यंत मुदतवाढ
अकोला,दि.६(जिमाका)- ग्रामपंचायत पोटनिवडणूक २०२१ साठी राज्य निवडणूक आयोगाने दि.१७ नोव्हेंबरच्या आदेशान्वये निवडणूक कार्यक्रम घोषीत केला आहे. त्यानुसार उमेदवारांना नामनिर्देशन पत्रे दाखल करणे शक्य व्हावे यासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा कालावधी दि.६ रोजी सायंकाळी पाच वा. पर्यंत वाढविला आहे. तर जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी जातपडताळणी समितीकडे सादर केलेल्या अर्जाची सत्यप्रत किंवा अर्ज सादर केल्याबाबतचा पुरावा तसेच विहित नमुन्यातील हमीपत्र सादर करण्यास दि.७ रोजी दुपारी १२ वा. पर्यंत मुदतवाढ देण्यात यावी असे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत.
०००००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा