कोविडमुळे मृत व्यक्तिंच्या निकट नातेवाईकांस सानुग्रह अनुदान : लवकरात लवकर ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

 अकोला,दि.१५(जिमाका)- कोविड १९ या आजाराने मृत पावलेल्या व्यक्तिंच्या निकट नातेवाईकांना ५० हजार रुपये इतके सानुग्रह अनुदान  देण्यात येणार आहे. त्यासाठी  शासनाने  विकसित केलेल्या पोर्टलवर कोविड मुळे मृत पावलेल्या व्यक्तिंच्या नातेवाईक, वारसांनी  लवकरात लवकर अर्ज करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी  केले आहे.

ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धती-

त्यासाठी अर्जदाराने mahacovid19relief.in  या संकेतस्थळावर लॉग ईन करणे आवश्यक आहे.  त्यासाठी https://epassmsdma.mahait.org/login.htm यावर लिंक देण्यात आली आहे. अर्जदारास त्याचा आधार क्रमांक, मृत व्यक्तीचे आधार कार्ड (पीडीएफ, जेपीजी), मृत्यू प्रमाण पत्र(पीडीएफ, जेपीजी), अर्जदाराचा आधार संलग्न  बॅंक खाते क्रमांक,  अर्जदाराने खाते कमांक दिलेल्या  बॅंक खात्याचा रद्द केलेला धनादेश (पीडीएफ, जेपीजी),आणि रुग्णालयाचा तपशिल आरटीपीसीआर रिपोर्ट, सीटी स्कॅन रिपोर्ट किंवा ज्यावरुन त्या व्यक्तीस कोविड १९ चे निदान झाले असे कागदपत्र (पीडीएफ, जेपीजी), तसेच कुटुंबातील सर्व वारसांचे हमीपत्र व स्वयंघोषणा पत्र अपलोड करावे.  या कागदपत्राच्या आधारे अर्जदाराला स्वतःचा मोबाईल क्रमांक वापरून सहाय्य मिळविण्यासाठी  लॉग ईन करता येईल. अर्ज सादर करण्याबाबत आवश्यक कागदपत्रांबाबत माहिती mahacovid19relief.in वर  Document Required  या टॅब वर उपलब्ध आहे.  जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून शासन निर्णयानुसार अंतिमतः मंजूर करण्यात आलेल्या अर्जानुसार, अर्जदाराच्या आधार संलग्नित बॅंक खात्यात सानुग्रह सहाय्य निधी जमा करण्याची कार्यवाही करण्यात येईल,असे जिल्हाधिकारी  निमा अरोरा यांनी कळविले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ