दिव्यांग पुनवर्सन केंद्रासाठी दि.30 डिसेंबरपर्यंत प्रास्तव मागविले


अकोला दि.24 (जिमाका)- केंद्र शासनाच्या सामाजिक न्‍याय दिव्‍यांगजन सशक्‍तीकरण विभाग  यांच्या संयुक्त विद्यमाने राज्‍यामध्‍ये जिल्‍हा दिव्‍यांग पुनर्वसन केंद्र सुरु करण्यासाठी गुरुवार दि. 30 डिसेंबरपर्यंत प्रस्ताव मागविले आहे.  जिल्‍हा दिव्‍यांग पुनर्वसन केंद्र सुरु करण्यासाठी संस्थेनी जास्तीत जास्त प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन जिल्हा व्यवस्थापण संघाचे सदस्य सचिव तथा जिल्हा समाज कल्याण अधिकारी  यांनी केले आहे.

 जिल्‍हा दिव्‍यांग पुनर्वसन योजना राबविण्‍यासाठी 17 जिल्ह्याच्या ठिकाणंची निवड केलेली असून उर्वरित 19  जिल्ह्यामध्ये देखील योजना राबविण्‍यासाठी सामाजिक न्‍याय विभागाने जिल्‍हा दिव्‍यांग केंद्र मंजुर नसलेल्‍या जिल्ह्यामध्ये जिल्‍हा व्‍यवस्‍थापन संघ (DMT) गठीत करणेबाबत व राज्‍य शासनाच्‍या शिफारशींसह जिल्‍हा दिव्‍यांग पुनर्वसन केंद्राचा प्रस्‍ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहे. त्‍या अनुषंगाने अकोला जिल्ह्यातील दिव्‍यांगाचे पुनर्वसन करणे व इतर अनुषंगीक कार्यासाठी जिल्‍हा दिवयांग पुनर्वसन केंद्र सुरू करण्याकरीता रेड क्रॉस सोसायटी, राज्‍य सरकारच्‍या स्‍वायत, अर्थस्‍वायत संस्‍था किंवा दिव्‍यांग क्षेत्रात उल्‍लेखनिय कार्य करणाऱ्या नोंदणीकृत संस्‍थाकडुन प्रस्‍ताव दि. ३० डिसेंबरपर्यत मागविण्‍यात येत आहे. केंद्र कार्यान्‍वीत करणे बाबत व व्‍यवस्‍थापन करणे बाबतची संपुर्ण माहिती व अर्जाचे प्रारूप http://disabilityaffairs.gov.in   या संकेतस्‍थळावर उपलब्‍ध आहे. तसेच अधिक माहितीकरीता जिल्‍हा समाज कल्‍याण विभाग व जिल्हा परिषद येथे संपर्क साधावा.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ