तीन दिवसीय राष्ट्रीय पशुवैद्यकीय परिषद: पशुरोगांच्या निदान व उपचारासाठी नवतंत्रज्ञानाचा अवलंब आवश्यक- डॉ.दक्षिणकर




 अकोला दि.३१(जिमाका)- कोरोना सारख्या साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर, पशू आणि मानव यांच्यातील सामा रोगाचा फैलाव लक्षात घेता, पशुंमध्ये वारंवार उद्भवणाऱ्या विविध रोगांचे वेळीच निदान अनुरूप औषधोपचारासाठी  पशुवैद्यकांनी नवतंत्रज्ञानाचा अवलंब करणे आवश्यक आहे,असे प्रतिपादन वासुदेव चंद्रकर कामधेनु विश्वविद्यालय, दुर्गचे कुलगुरु प्रा. डॉ. नारायण दक्षिणकर यांनी केले.

महाराष्ट्र पशु मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर अंतर्गत अकोला येथील घटक महाविद्यालय स्नातकोत्तर पशुवैद्यक आणि पशुविज्ञान संस्था यांचे वतीने दिनांक २७ ते २९ डिसेंबर दरम्यान तीन दिवसीय आभासी राष्ट्रीय पशुवैद्यकीय परिषदेचे उद्घाटन डॉ. दक्षिणकर यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

महाराष्ट्र पशु मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूरचे कुलगुरु प्रा. डॉ. कर्नल आशिष पातूरकर यांच्या मार्गदर्शनात स्ना.प.प.संस्था अकोला येथे पशुवैद्यक क्षेत्रातील वारंवार उद्भवणार्‍या रोगांचे निदान आणि औषधोपचारमधील नवनवीन पद्धती या विषयावराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी संचालक शिक्षण अधिष्ठाता प्रा. डॉ. एस. व्ही. उपाध्ये, संचालक विस्तारशिक्षण प्रा. डॉ. ए.यू. भिकाने यांचीही उपस्थिती होती. यावेळी संशोधनपर लेखांच्या सारांशपुस्तिकेचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

आयोजन समितीचे अध्यक्ष सहयोगी अधिष्ठाता प्रा. डॉ. धनंजय दिघे यांनी परिषदेच्या आयोजनाची भूमिका स्पष्ट केली.  प्रास्ताविक आयोजन सचिव डॉ. किशोर पजई यांनी केले.

तीन दिवस चाललेल्या या परिषदेत पशुऔषध उपचारशास्त्र, पशु शल्यचिकित्सा क्ष किरण शास्त्र, पशुप्रजनन प्रसूती शास्त्र आणि पशुरोगनिदान शास्त्र इ. विषयावर नामवंत वक्त्यांनी मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांचे ऑनलाईन सादरीकरणही झाले.

समारोपप्रसंगी डॉ. सुनील वाघमारे यांनी अहवाल वाचन करून परिषदेचा वृत्तांत सादर केला. या परिषदेत महाराष्ट्रासह इतर राज्यातील सहभागी एकूण २८४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. १०२ स्नातकपूर्व पदवी विद्यार्थी आणि १०७ स्नातकोत्तर पदवी विद्यार्थी यांनी आपले पशुचिकित्सालयीन संशोधन सादर केले. आयोजक सह सचिव डॉ. महेश इंगवले यांनी स्पर्धेचा निकाल जाहीर केला.

स्पर्धेतील विजेते विद्यार्थी याप्रमाणे-

पशुऔषध उपचारशास्त्र विषयात स्नातकपूर्व प्रवर्गात प्रथम क्र- एस.जननी; व्दितीय क्र.एस. सारथ; तृतीय क्र.पी. पवित्रा तसेच स्नातकोत्तर प्रवर्गात  प्रथम क्र- के. मोहनांबल; व्दितीय क्र.ए. रागिनी; तृतीय क्र.हनील जॉन डिसूझा

पशु शल्यचिकित्सा व क्ष किरण शास्त्र: स्नातकपूर्व प्रवर्गात  प्रथम क्र- कु. श्रेया पराशर; व्दितीय क्र.एस.संधिया; तृतीय क्र.कीर्ती आणि स्नातकोत्तर प्रवर्गात  प्रथम क्र- आशीष क्रिस्तोफर; व्दितीय क्र. कु. सौम्या रमनकुट्टी; तृतीय क्र.कु. अंजु पुनिया

पशुप्रजनन व प्रसूती शास्त्र: स्नातकपूर्व स्नातकपूर्व प्रवर्गात प्रथम क्र- जे. थिलायस्वारी; व्दितीय क्र.व्ही.निवेदिता; तृतीय क्र.हर्षित सक्सेना तसेच स्नातकोत्तर प्रवर्गात  प्रथम क्र- एम.प्रवीण कुमार; व्दितीय क्र.आर.डी. प्रजापती; तृतीय क्र.अबोली कथे आणि अशोक वालीकर

पशुरोगनिदान शास्त्र :स्नातकपूर्व  प्रवर्गात  प्रथम क्र- एस.सुंदरप्रेम; व्दितीय क्र.-कु. प्रतिभा गोयल; तृतीय क्र.-आर.जे. लेंडेवाड आणि स्नातकोत्तर प्रवर्गात  प्रथम क्र-कु. दिव्या सभरवाल; व्दितीय क्र. पी.उरकुडे; तृतीय क्र. एम.रामटेके

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. कुलदीप देशपांडे, डॉ. गिरीश पंचभाई यांनी केले तर डॉ. पजई, यांनी आभार प्रदर्शन केले. परिषदेच्या आयोजनासाठी प्रा. डॉ. चैतन्य पावशे, डॉ. मिलिंद थोरात, डॉ. रत्नाकर राऊळकर, डॉ. रंजीत इंगोले, डॉ. प्राजक्ता कुरळकर, डॉ. श्याम देशमुख, डॉ. भुपेश कामडी, डॉ. सुनील हजारे, डॉ. व्ही. बी. काळे आदींनी परिश्रम घेतले.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ