विशाखा समिती वर्धापन दिन :स्वतःला सुरक्षित समजा व निर्भयपणे काम करा-संजय खडसे





 अकोला, दि.९(जिमाका)- कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळापासून संरक्षण ( प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम २०१३  या कायद्याचा आठवा वर्धापन दिन आज विशाखा समिती वर्धापन दिन म्हणून साजरा करण्यात आला. यानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील महिला अधिकाऱ्यांनी स्वतःला सुरक्षित समजावे व निर्भयपणे काम करावे, अशा शद्बात निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी उपस्थित महिलांना संबोधित केले.

लोकशाही सभागृहात आयोजित कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांच्या समवेत उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, सदाशिव शेलार, अधीक्षक मिरा पागोरे,  गजान महल्ले तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व विभागांतील महिला कर्मचारी अधिकारी उपस्थित होत्या. यावेळी उपस्थित महिलांमधील श्रीमती शर्मा यांनी या कायद्याविषयी व त्याअन्वये गठीत करण्यात आलेल्या विशाखा समितीबाबत माहिती दिली. यावेळी  महल्ले यांनी उपस्थितांचा परिचय व प्रास्ताविक केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन करुन  कायद्याविषयी व यासंदर्भात महिलांना असलेल्या अधिकारांविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालक श्रीमती पागोरे यांनी तर आभार प्रदर्शन श्रीमती टाकळे यांनी केले.

००००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ