निर्यातक्षम आंबा व डाळींब फळबागांची मॅगोनेट व अनारनेट ऑनलाईन प्रणालीवर नोंदणी करा

अकोला, दि.१७(जिमाका)- निर्यातक्षम आंबा व डाळिंब फळबागेचे मॅगोनेट व अनारनेट या प्रणालीवर नोंदणीकरीता शुक्रवार दि. ३१ डिसेंबरपर्यंत विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. आंबा व डाळींब पिकांखालील क्षेत्र व निर्यातीला चालना देण्यासाठी शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त निर्यातक्षम फळबागांचे ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन पुणे येथील फलोत्पादन व कृषी आयुक्तालयाचे संचालक  डॉ.कैलास मोते यांनी केले आहे.

            निर्यातक्षम फळबागेची नोंदणी करण्यासाठी मॅगोनेट व अनारनेट ही ऑनलाईन प्रणाली गुरुवार दि. १६ पासून कार्यान्वित करण्यात आली आहे. सन २०२१-२२  मध्ये मॅगोनेट प्रणालीवर  ११ हजार ९९५ आंबा व  अनारनेटवर एक हजार ५१८ डाळींब फळबागांची नोंदणी झाली आहे. सर्व जिल्हानिहाय लक्षांक निश्चित करण्यात आला असून त्यानुसार निर्यातक्षम आंबा व डाळींब फळबागेची नोंदणी व तपासणी करणेकरीता कृषी सहाय्यक,  कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी यांना तपासणी अधिकारी म्हणून प्राधिकृत करण्यात आले आहे. निर्यातक्षम फळबागांची ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी अपेडाव्दारे फार्म रजिस्ट्रेशन मोबाईल ॲपव्दारे सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या ॲपव्दारे निर्यातक्षम फळबागांची नोंदणी करणेसाठी दि. १६ ते ३१ डिसेंबर या कालावधीत जास्तीत जास्त आंबा व डाळींब  उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या बागांची  नोंदणी  करुन  घ्यावी. अधिक माहितीसाठी  आपल्या नजिकच्या कृषी सहाय्यक, मंडळ कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी  यांच्याशी संपर्क साधावा.

०००००


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ