भिक्षेकरी गृहाकरीता विना अनुदानित स्‍वयंसेवी संस्‍थेकडून प्रस्ताव आमंत्रित

 अकोला दि.23 (जिमाका)-  महिला व बालविकास विभागाच्या शासन निर्देशाप्रमाणे विना अनुदानीत तत्‍वावर जिल्ह्यात 100 प्रवेशित क्षमतेचे भिक्षेकरी गृह चालविण्‍यासाठी स्‍वयंसेवी संस्‍थेमार्फत दि. 11 जानेवारीपर्यंत प्रस्‍ताव  आमंत्रित केले आहे. भिक्षेकरी गृहाकरीता प्रस्ताव चार प्रतीत सादर करावा. तसेच भिक्षेकरी गृह विनाअनुदान तत्वावर चालविण्याकरता प्रस्ताव सादर करावयाच्या निकषाच्या यादीची प्रत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय येथे कार्यालयीन वेळेत प्राप्त करुन घेता येतील.

प्रस्तावासोबत सादर करावयाच्या निकषाची प्रत शुक्रवार दि. 27 ते 31 डिसेंबर दरम्यान वाटप होईल. परिपुर्ण असलेले प्रस्ताव दि. 3 ते 11 जानेवारीपर्यंत स्विकारण्यात येईल. मुदतीनंतर प्राप्त होणारे प्रस्तावाचा स्विकारले जाणार नाही, याची नोंद घ्यावी. अधिक माहितीकरीता जिल्हा महिला व बालविकास कार्यालय, जिल्हाधिकारी परिसर अकोला येथे किंवा भ्रमणध्वनी क्रमांक 9970082472 वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापन समिती सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे यांनी केले आहे.

0000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ