दिव्यांगांकरीता युडीआयडी कार्ड वाटप; तालुकास्तरावर शिबीराचे आयोजन

 अकोला, दि.16(जिमाका)-जिल्ह्यातील दिव्यांगांना शासनाच्या विविध योजनेचा लाभ मिळावा याकरीता दिव्यांग वैश्विक ओळखपत्र तयार करण्यात आले आहे.  युडीआयडी कार्ड वाटपाकरीता तालुकास्तरावर शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीराचा लाभ सर्व दिव्यांगांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी केले.

शिबिरांचे स्थळ याप्रमाणे : जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग अकोला येथे  दि. 23 डिसेंबर रोजी, जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला येथे दि. 1 जानेवारी 2022 रोजी, पंचायत समिती अकोट येथे दि. 4 जानेवारी, पंचायत समिती तेल्हारा येथे दि. 5 जानेवारी, पंचायत समिती बाळापूर येथे दि. 11 जानेवारी, पंचायत समिती पातुर येथे दि. 12 जानेवारी, पंचायत समिती बार्शीटाकळी येथे दि. 14 जानेवारी व पंचायत समिती मुर्तिजापूर येथे दि. 18 जानेवारी रोजी सकाळी 11 ते 5 यावेळेत सर्व ठिकाणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ