स्नातकोत्तर पशूवैद्यक व पशूविज्ञान संस्थेचा उपक्रम; पशूंमधील आधुनिक भुलपद्धतीः एक दिवसीय प्रशिक्षण व प्रात्यक्षिक

 




अकोला, दि.१७(जिमाका)- पाळीव किंवा वन्य पशूंमध्ये औषधोपचार करताना पशुवैद्यकांनी शस्त्रक्रियेदरम्यान भूलतंत्रज्ञानाच्या नवनवीन पद्धती जाणून घेणे अत्यंत महत्वाचे असून यामुळे पशूंच्या वेदना पातळीत घट होऊन शस्त्रक्रिया यशस्वीपणे हाताळण्यास मदत होते, असे प्रतिपादन प्रा. डॉ. शिरीष उपाध्ये, संचालक विद्याशाखा, महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपुर यांनी व्यक्त केले.

येथील स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्थेत येथे महाराष्ट्र राज्य पशुवैद्यक संघटना (MSVC) यांचे संयुक्त विद्यमाने आणि भारतीय पशुवैद्यक परिषद (VCI) पुरस्कृत ‘पशूंमधील सर्वसाधारण भूल पद्धती’ या विषयावर एक दिवसीय प्रशिक्षण व प्रात्यक्षिकाचे आयोजन (दि.१५) निरंतर पशुवैद्यक शिक्षण (CVE) कार्यक्रमांतर्गत करण्यात आले. या प्रशिक्षण सत्राच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. उपाध्ये बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथि भारतीय पशुवैद्यक परिषद तथा मा. सदस्य - कार्यकारिणी परिषद, मपमविवि, नागपुर डॉ. संदीप इंगळे, डॉ. एस. सेंथिल कुमार, तंजावर हे उपस्थित होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सहयोगी अधिष्ठाता प्रा. डॉ. धनंजय दिघे यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ, शाल व श्रीफल देऊन स्वागत केले.प्रास्ताविक संयोजक समन्वयक पशू शल्यचिकित्सा व क्ष किरण विभाग प्रमुख  प्रा. डॉ. मिलिंद थोरात यांनी केले.

उद्घाटन प्रसंगी बोलताना डॉ. उपाध्ये यांनी पशूंच्या शस्त्रक्रियेदरम्यान असलेले भूल तंत्रज्ञान पद्धतीचे अनन्यसाधारण महत्व अधोरेखित केले.डॉ. इंगळे यांनी पशूवैद्यकांनी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करीत पशूसेवेचा वसा जपण्याचे आवाहन केले. याप्रसंगी मान्यवरांचे हस्ते प्रशिक्षण पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. या प्रशिक्षणात पशूसंवर्धन विभागातील अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा या जिल्ह्यातून सहाय्यक आयुक्त पशूसंवर्धन, पशुधन विकास अधिकारी तसेच अकोला व नागपुर येथील प्राध्यापकवृंद आणि

स्नातकोत्तर पशूवैद्यक विद्यार्थी मोठ्या संख्येने कोविड नियमावलीचे पालन करत उपस्थित होते. उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन डॉ. रत्नाकर राऊळकर यांनी केले. उपस्थित प्रशिक्षणार्थ्यांना याप्रसंगी डॉ. सेंथिल कुमार, डॉ. थोरात आणि डॉ. रत्नाकर राऊळकर यांनी लहान व मोठ्या पशूंमध्ये भूल (anesthesia) देण्याच्या विविध तंत्रज्ञानाची ओळख प्रात्यक्षिकच्या माध्यमातून करून दिली.

समारोपप्रसंगी प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. डॉ. व्ही.बी. देशमुख, डॉ. अवघड, डॉ. आखरे आणि डॉ. पंकज घावट यांनी समाधानकारक प्रतिक्रिया देत प्रशिक्षण कार्यक्रमाचा अभिप्राय व्यक्त केला. याप्रसंगी डॉ. दिघे यांनी  पशूवैद्यकांनी भूल पद्धतीचा उपयोग आत्मविश्वासपूर्ण तर्‍हेने करण्याचे मत प्रतिपादित केले. याप्रसंगी सूत्रसंचालन डॉ. प्रवीण बनकर यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. राऊळकर यांनी केले. या प्रशिक्षणासाठी डॉ. चैतन्य पावशे, डॉ. सुनील वाघमारे, डॉ. श्याम देशमुख, डॉ. महेश इंगवले, डॉ. राऊळकर, डॉ. कुरळकर यांचेसह डॉ. रत्नपारखी, डॉ. काळे, तसेच विभागाच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ