जलस्त्रोतांच्या बळकटीकरणासाठी ‘जलशक्ती अभियान’

 


अकोला, दि.15(जिमाका)- जलसंधारणाच्या विविध उपचारांचा अवलंब करुन जलस्त्रोत्यांचे बळकटीकरण करण्यासाठी जलशक्ती अभियान राबविण्यात येणार असून त्यासाठी जिल्हा जलसंधारण अधिकाऱ्यांची जिल्हा नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

यासंदर्भात  जिल्हा जलसंधारण अधिकारी हरिभाऊ गिते यांनी दिलेल्या माहितीनुसार, पावसाच्या पाण्याचे संकलन करण्यात येणाऱ्या स्ट्रक्चरचे बांधकाम व दुरुस्तीद्वारे  पाण्याचा साठा वाढविणे, अस्तित्वातील तलाव-जलस्रोतांचे पुनरूज्जीवन करणे, पावसाळ्यापूर्वी नद्यांचे पुनरूज्जीवन करणे, सर्व पाणीसाठवण बांधकामांची, योजनांची जीओ टँगिंगसह प्रगणना करणे, जलसंधारण आणि जलसंधारण संरचनेसाठी वैज्ञानिक योजना करणे व जलशक्ती केंद्राची स्थापना करणे आदि उद्धिष्टांवर आधारित जलशक्ती अभियान जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे.

या अभियानांतर्गत वैज्ञानिक जिल्हास्तरीय जलसंधारण योजनेचे नियोजन करण्यात येणार आहे. त्याकरिता जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनात जिल्हा जलसंधारण अधिकाऱ्यांची जिल्हा नोडल अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे. जिल्हा जलसंधारण अधिकारी हरिभाऊ गिते यांचे मार्गदर्शनात शाखा अभियंता संजय कुंभारे केंद्रामध्ये तांत्रिक सहाय्यक कामकाज पाहणार आहेत. या अभियानानिमित्त जलशक्ती केंद्र फलकाचे अनावरण जिल्हा जलसंधारण अधिकारी हरिभाऊ गिते यांचे हस्ते करण्यात आले.  त्यावेळी सहाय्यक जिल्हा जलसंधारण अधिकारी  राजेश गिरी, लेखाधिकारी परळीकर, शाखा अभियंता संजय कुंभरे व  अन्य कर्मचारी उपस्थित होते.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ