कोविडः आरटीपीसीआर व रॅपिड ‘निरंक’

 आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) २७३ अहवाल प्राप्त झाले. त्यात  कुणाचाही अहवाल पॉ‍झिटीव्ह आला नाही, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

त्याच प्रमाणे काल (दि.24) रॅपिड ॲटीजेन चाचणी अहवाल प्राप्त झाला नाही.  त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 57908(43296+14435+177) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर शुन्य  + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी शुन्य  = एकूण पॉझिटीव्ह शुन्य.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 342464 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 338808 फेरतपासणीचे 402 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 3254 नमुने होते. आजपर्यंत एकूण 342464 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 299168  आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.  

शुन्य  पॉझिटीव्ह

आज  दिवसभरात आरटीपीसीआर कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, तर रॅपिडचा अहवाल आज प्राप्त झाला नाही, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.

सहा जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 57908(43296+14435+177) आहे. त्यात 1141  मृत झाले आहेत. तर 56761 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत सहा जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे. 

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ