महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग राज्यसेवा (पूर्व) परीक्षेसाठी १७ केंद्रांवर व्यवस्था; परीक्षाकेंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी

        अकोला, दि.२७(जिमाका)-     महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातर्फे राज्यसेवा पुर्व परीक्षा रविवार दि.२ जानेवारी २०२२ रोजी होणार आहे. अकोला जिल्ह्यात  अकोला शहरातील  एकूण १७ उपकेंद्रावर सकाळी १० ते १२ आणि दुपारी ३ ते ५ या वेळेत ही परीक्षा होणार आहे.  ही परीक्षा  शांत व सुरक्षित वातावरणात पार पाडावी यासाठी  सर्व परीक्षा केंद्र परिसरात  प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले आहेत.

            यासंदर्भात जारी केलेल्या आदेशात म्हटल्यानुसार  परीक्षा केंद्रावर गायरप्रकार होऊ नये तसेच कायदा व सुवव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी  फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये रविवार दि. २ जानेवारी रोजी सकाळी सहा ते सायंकाळी आठ यावेळात  सर्व १७ परीक्षा केंद्राच्या आतील संपूर्ण परिसरात व केंद्राचे बाहेरील लागून १०० मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.

उपकेंद्राचे नाव व पत्ता : शिवाजी आर्ट, कॉमर्स अन्ड सायन्स कॉलेज मोर्णा बिल्डींग, शिवाजी पार्क, अकोट रोड अकोला.

शिवाजी आर्ट, कॉमर्स अन्ड सायन्स कॉलेज पुर्णा बिल्डींग, शिवाजी पार्क, अकोट रोड अकोला.

जागृती विद्यालय व उच्च माध्य. विद्यालय, रणपीसे नगर.

भारत विद्यालय तापडीया नगर.

एल.आर.टी.कॉलेज ऑफ कॉमर्स रतनलाल प्लॉट सिव्हील लाईन नेकलेस रोड.

एस. आर.पाटील. आर्ट. कॉमर्स अन्ड सायन्‍स ज्युनिअर कॉलेज अकोला सहकार नगरच्या मागे गोरक्षण रोड.

श्रीमती मेहरबानो ज्यु. कॉलेज ऑफ सायन्स म. गांधी मार्ग, प्रमिलाताई ओक हॉल जवळ.

सिताबाई कला महाविद्यालय सिव्हील लाईन रोड.

आर.एल.टी.कॉलेज ऑफ सायन्स सिव्हील लाईन.

मोहरीदेवी खंडेलवाल विद्यालय गोडबोले प्लॉट,डाबकी रोड जुने शहर.

कमल डवले ज्युनिअर कॉलेज चाचोंडी रोड मोठी उमरी.

गुरुनानक विद्यालय गांधीनगर सिंधी कॅम्प.

दि. नोएल  इंग्लिश हायस्कुल विभागीय वर्कशॉपच्या मागे, कौलखेड रोड.

कोठारी कॉन्व्हेंट  इंग्लिश स्कुल विद्यानगर गोरक्षण रोड, इन्कम टॅक्स चौक.

खंडेलवाल ज्ञानमंदीर कॉन्व्हेंट  गोरक्षण रोड.

शिवाजी हायस्कुल मुख्य शाखा देशमुख पेठ शिवाजी पार्कजवळ अकोट रोड.

जि.एस.कॉन्व्हेंट मुख्य पोस्ट ऑफीसच्या मागे, अकोला.

 आदेशात नमूद केल्यानुसार या सर्व  परीक्षा केंद्रांच्या परिसरात प्रवेश करतेवेळी पाच पेक्षा जास्त व्यक्ती एकत्रीतरित्या प्रवेश करणे,  परीक्षा केंद्र परिसरात घोषणा देणे,  यास मनाई करण्यात आली आहे. तसेच परीक्षा केंद्रावर प्रवेश करणाऱ्या सर्व परीक्षार्थी, अधिकारी,  कर्मचाऱ्यांचे थर्मल, इफ्रारेड थर्मामिटरद्वारे तापमान तपासण्यात यावे, सर्व पर्यवेक्षकांची रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट करणे अनिवार्य आहे. हवा खेळती राहण्याचे दृष्टीने परीक्षा केंद्रावरील सर्व खिडक्या तसेच दरवाजे उघड्या ठेवण्यात याव्यात. सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच परीक्षार्थी यांना मास्कचा वापर करणे बंधनकारक राहील. परीक्षार्थी यांना ओळख असल्याशिवाय व मास्क लावल्याशिवाय प्रवेश देण्यात येवू नये. प्रत्येक परीक्षार्थी मध्ये किमान तीन फुटाचे अंतर राहील. अशी बैठक व्यवस्था करण्यात यावी. परीक्षा केंद्राच्या परिसराचे सोडियम हायपोक्लोराईटच्या सहाय्याने निर्जंतुकीकरण करण्यात यावे.कोणत्याही परिक्षार्थी, अधिकारी, कर्मचारी यांना कोव्हिड १९ ची लक्षणे दिसून आल्यास तात्काळ नजिकच्या रुग्णालयात भरती करावे. परीक्षा केंद्राच्या परिसरात परीक्षार्थी अथवा अन्य  व्यक्तींकडून शांततेत बाधा निर्माण होईल असे कोणतेही कृत्य करण्यात येणार नाहीत. परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरातील झेरॉक्स सेंटर, फॅक्स मशीन, पानपट्टी, लॅपटॉप, टायपिंग सेंटर, एसटीडी, ध्वनीक्षेपक इत्यादी माध्यम परीक्षा संपेपर्यंत बंद ठेवण्यात येतील. परीक्षा केंद्राचे परिसरात इंटरनेट, मोबाईल, फोन, सेल्युलर फोन ई-मेल व इतर प्रसार माध्यमे घेऊन प्रवेश करण्यास मनाई राहील. परीक्षा केंद्रावर कोणत्याही अनाधिकृत व्यक्ती, वाहनास प्रवेशास मनाई राहील. उपरोक्त प्रतिबंधात्मक आदेश परीक्षा केंद्रावर नियुक्त अधिकारी, कर्मचारी, परीक्षार्थी तसेच परीक्षा केंद्रावर देखरेख करणारे अधिकृत अधिकारी, कर्मचारी व पोलीस अधिकारी यांचेबाबत परीक्षा संबंधित कर्तव्य पार पाडण्याचे दृष्टीने लागू राहणार नाहीत,असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ