डाक कार्यालयात करता येणार आधार कार्डला मोबाईल लिंक

 अकोला दि.24 (जिमाका)- जिल्ह्यातील सर्व पोस्ट ऑफिसमध्ये आधार कार्डला मोबाईल क्रमांक लिंक करण्याची सुविधा सुरु करण्यात आली आहे. या सुविधेचा सर्व नागरिकांनी लाभ घेण्यासाठी जवळील पोस्ट ऑफीस येथे संपर्क साधावा, असे आवाहन संजय गांधी योजनाचे तहसिलदार मिरा पागोरे यांनी  केले.

आधार कार्ड मोबाईल क्रमांक लिंकचे फायदे :

पीएम किसान पोर्टलवर स्वत: ई-केवायसी करणे, पॅनकार्ड वाहन परवाना व पासपोर्ट काढणे, आयकर रिर्टन भरणे, विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज,  केंद्र तसेच राज्य शासनाच्या विविध योजनांचे लाभ प्राप्त करणे, स्वत:च्या स्वत: आधार कार्डमध्ये किरकोळ बदल करणे, आपल्या आधारचा इतरांकडुन होणारा दुरुपयोग टाळणे तसेच बँक व डी-मॅट खाती सुरु करणे, इत्यादी सुविधा उपलब्ध होणार आहे.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम