विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदार संघ निवडणूक; मतमोजणीचे पहिले प्रशिक्षण सत्र




अकोला,दि.8(जिमाका)- विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदार संघ निवडणूक 2021 च्या निवडणूक कार्यक्रमानुसार मंगळवार दि.14 रोजी मतमोजणी होणार आहे. त्याअनुषंगाने निवडणूक अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आज मतमोजणी केंद्रावरील जबाबदाऱ्यांबाबत  प्रशिक्षण देण्यात आले. आजचे हे प्रशिक्षणाचे पहिले सत्र होते.

आजच्या प्रशिक्षणाचे आयोजन जिल्हा नियोजन भवन येथील सभागृहात करण्यात आले होते. यावेळी मतदार संघातील सर्व सहा. निवडणूक निर्णय अधिकारी  व प्रत्यक्ष मतमोजणी केंद्रावरील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. या प्रशिक्षणास निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मुकेश चव्हाण,  उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, विश्वनाथ घुगे, गजानन सुरंजे, प्रांताधिकारी बाळापूर रामेश्वर पुरी, मुर्तिजापूर अभयसिंह मोहिते पाटील, अकोला डॉ. निलेश अपार तसेच सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

 या प्रशिक्षणात कर्मचाऱ्यांना  मतमोजणी प्रक्रिया, मतमोजणी केंद्रावरील रचना, नियुक्त केलेल्या प्रत्येकाची जबाबदारी व कर्तव्ये, सुक्ष्म निरीक्षकांच्या जबाबदाऱ्या, मतमोजणीचे नियोजन व कार्यपद्धती तसेच वैध, अवैध मतपत्रिकाबाबतची माहिती देण्यात आली. मतमोजणी पारदर्शक पार पडावी याकरीता सर्वानी दक्षता घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी  संजय खडसे यांनी केले.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ