विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदार संघ निवडणूक २०२१: प्रतिबंधात्मक आदेश जारी

 अकोला, दि.९(जिमाका)-विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदार संघाची निवडणूक प्रक्रिया अकोला-बुलडाणा- वाशिम मतदार संघासाठी राबविली जात आहे. ही प्रक्रिया शांततेत,निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी निमा अरोरा यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम १४४ अन्वये खालीलप्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

आदेशात नमूद केल्यानुसार,

१)ज्या ठिकाणी मतदान होणार आहे त्या मतदान केंद्रापासून २०० मिटर परिसरात पक्षांचे मंडप,  दुकाने, मोबाईल फोन,  पेजर,  वायरलेस सेट, ध्वनिक्षेपक, सर्व प्रकारचे फेरीवाले अन्य इलेक्ट्रॉनिक  उपकरणे, निवडणूकीच्या कामाव्यतिरिक्त खाजगी वाहन, संबंधित पक्षांचे चिन्हांचे प्रदर्शन तसेच निवडणूक कामाव्यतिरिक्त  कोणत्याही व्यक्तीस  प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

२) ज्या ठिकाणी निवडणूक साहित्य कक्ष (Stronag Room) आहेत,असेच जिल्ह्यातील मतदान केंद्रावर आणि ज्या ठिकाणि मतमोजणी होणार आहे, अशा ठिकाणी  २०० मिटर परिसरात  प्रतिबंधात्मक आदेश लागू राहतील.

३) तसेच कोविड १९ च्या अनुषंगाने नियमावलीचे पालन करणे आवश्यक आहे.

हे आदेश निवडणूक प्रक्रिया पूर्ण  होईपर्यंत  लागू राहतील,असेही स्पष्ट करण्यात आले आहेत.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ