पतंग उत्सव साजरा करतांना पक्षांची काळजी घ्या- जिल्हाधिकारी निमा अरोरा; जखमी पक्षांच्या सुश्रुषेसाठी ‘सेव्ह बर्डस अकोला’ संस्थेचा पुढाकार

 अकोला, दि.१४(जिमाका)- मकर संक्रांतीस पतंग उत्सव साजरा करतांना  आकाशात उडणाऱ्या पक्षांची काळजी घ्या,असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे. पतंगोत्सवा दरम्यान अथवा एरवीही जखमी पक्षी आढळल्यास अशा पक्षांना  सेव्ह बर्डस अकोला या संस्थेकडे सुश्रुषा व उपचारासाठी सुपूर्द करावे,असेही आवाहन करण्यात आले आहे.

यासंदर्भात जिन आज्ञा ग्रुप या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी निमा अरोरा यांची भेट घेतली. मकर संक्रांतीच्या पार्श्वभुमिवर  प्रतिबंधित असणाऱ्या नायलॉन मांजा विक्री व वापरास मनाई असून त्यामुळे माणसांना व आकाशात विहारणाऱ्या पक्षांना  गंभीर इजा होऊन नुकसान होते. शिवाय अनेक पक्षांना प्राणास मुकावे लागते. तथापि, पतंग उडविण्याच्या मकर संक्रांतीच्या पर्वात पक्षांच्या जखमी होण्याच्या संख्येत वाढ होत असल्याची बाब निदर्शनास आणून दिली. तसेच माणसांनाही नायलॉन मांजाच्या वापरामुळे गंभीर दुखापत होत असल्याच्या घटना घडत असतात. नायलॉन मांजामुळे पतंग उडवितांना आकाशात विहरणारे पक्षी तसेच  तुटलेल्या पतंगासोबत लटकलेल्या मांजामध्ये अडकूनही अनेक पक्षी जायबंदी होत असतात. अशा जखमी पक्षांना ‘सेव्ह बर्डस अकोला’ या संस्थेचे कार्यकर्ते उपचार करतात. त्यासाठी त्यांचा हेल्पलाईक क्रमांक ७२४९४५९६६६ असा आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ