कोविडः एक पॉझिटीव्ह, तीन डिस्चार्ज व एक मृत्यू; रॅपिड ॲटीजेनमध्ये शुन्य पॉझिटीव्ह

 

अकोला दि.8(जिमाका)-आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 333 अहवाल प्राप्त झाले. त्यात  एकाचा अहवाल पॉ‍झिटीव्ह आला. होम आयसोलेशन येथून तीन जणांना डिस्चार्ज तर एकाचा मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

त्याच प्रमाणे काल (दि.7) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 57904(43293+14434+177) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर एक + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी शुन्य = एकूण पॉझिटीव्ह एक.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 337056 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 333403 फेरतपासणीचे 402 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 3251  नमुने होते. आजपर्यंत एकूण 337056 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 293763 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.  

एक पॉझिटीव्ह

आज  दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यात एका महिला रुग्णाचा अहवाल  पॉझिटीव्ह आला. ही महिला मनपा क्षेत्रातील रहिवासी आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.

एक मयत

दरम्यान काल एकाचा मृत्यू झाला. हा रुग्ण जठारपेठ, अकोला येथील 60 वर्षीय महिला असून ती दि. 29 नोव्हेंबर रोजी दाखल झाली होती. त्यांचा उपचारा घेतांना मृत्यू झाला, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे. 

तीन जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर होम आयसोलेशन येथून तीन जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.

नऊ जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 57904(43293+14434+177) आहे. त्यात 1140  मृत झाले आहेत. तर 56755 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत नऊ जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे. 

रॅपिड ॲन्टीजेन चाचण्याः 205 चाचण्यात शुन्य पॉझिटीव्ह

 कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.7) दिवसभरात झालेल्या 205 चाचण्या झाल्या त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली. 

       काल दिवसभरात अकोला येथे तीन, अकोट येथे 16, बार्शीटाकळी येथे दोन, मुर्तिजापूर येथे चार, अकोला महानगरपालिका येथे 117, जिल्हा आरोग्य कर्मचाऱ्यांची 16, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 42 तर हेगडेवार लॅब येथे पाच चाचण्या झाल्या त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, असे एकूण 205 चाचण्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही,  असे जिल्हा रुग्णालयाने कळविले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ