शासकीय राज्यगृहातील महिलांचे लसीकरण पूर्ण


अकोला, दि.22(जिमाका)- महिला व बाल विकास कार्यालयाव्दारे जिल्ह्यातील शासकीय जागृती महिला राज्यगृह संस्थेतील 18 वर्षावरील महिलेचे दोन्ही डोस देवून लसीकरण पुर्ण केले. शिबीराच्या माध्यमातून ऑगस्ट महिण्यात पहिला डोस तर नोव्हेंबर महिण्यात दुसरा डोस देण्यात आला, अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विलास मरसाळे यांनी दिली.

महिला राज्यगृहात 44 महिला प्रवेशीत असून महिला राज्यगृहात निराधार, निराश्रीत, पिडीत महिला दाखल होतात. कोरोना विषाणु तसेच कोरोनाच्या म्युटेशन ओमायक्रॉनचा फैलाव रोखण्यासाठी लसीकरणाचे दोन्ही डोस पुर्ण करणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने संस्थेतील सर्व महिला व कर्मचाऱ्यांना लसीकरण पुर्ण करण्यात आले आहे. लसीकरण करण्याकरीता जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विलास मरसाळे, जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे सुनिल लाडुलकर, संस्थेचे अधिक्षक अमित रायबोले व कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ