नोकरी करणाऱ्या महिलांसाठी स्वयंसेवी संस्थेकडुन भाडेतत्वावर वसतीगृहाचे प्रस्ताव मागविले

 

अकोला दि.23 (जिमाका)- नोकरी करणाऱ्या महिलांसाठी केंद्र शासनाव्दारे वसतीगृहाची योजना राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत महिला व बालविकास विभागाव्‍दारे  जिल्ह्यातील स्‍वयंसेवी संस्‍थेमार्फत भाडेतत्वावर वसतीगृहाचे प्रस्ताव दि. 11 जानेवारी 2022 पर्यंत करावे, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापन समिती सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे यांनी केले आहे.

 जिल्ह्यात नोकरी करणाऱ्या महिलाकरीता स्वयंसेवी संस्था यांच्या अनुक्रमे 60:15:25 या हिस्याच्या प्रमाणात अटीशीर्तीचे पुर्तता करणाऱ्या संस्थेकडुन पाच प्रतीत प्रस्ताव मागविण्यात येत आहे. शासन निर्णयानुसार परिशिष्‍ट अ व ब मध्‍ये नमुद करण्‍यात आलेल्‍या मार्गदर्शक तत्‍वाची व कागदपत्राची पुर्तता करणाऱ्या स्वयंसेवी संस्थाचे प्रस्ताव स्विकारण्यात येईल. परिशिष्ट अ व ब ची प्रत जिल्‍हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, अकोला येथे कार्यालयीन वेळेत दि. 27 ते 31 डिसेंबरपर्यंत वाटप होईल. तर परिपुर्ण असलेले स्वयंसेवी संस्थेचे प्रस्ताव दि. 3 ते 11 जानेवारीपर्यंत स्विकारले जाईल. अधिक माहितीकरीता जिल्हा महिला व बालविकास कार्यालय, जिल्हाधिकारी परिसर अकोला येथे किंवा भ्रमणध्वनी क्रमांक 9970082472 वर संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.  

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ