कोविडः आरटीपीसीआर व रॅपिड ‘निरंक’ तर एकाचा मृत्यू
अकोला दि.12(जिमाका)-आज
दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 326
अहवाल प्राप्त झाले. त्यात कुणाचाही
अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, तर एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत
कळविण्यात आले आहे.
त्याच प्रमाणे काल (दि.11) रॅपिड
ॲटीजेन टेस्ट मध्ये कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह
आला नाही.
त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 57906(43295+14434+177) झाली आहे, अशी
माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर शुन्य + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी शुन्य = एकूण
पॉझिटीव्ह शुन्य.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत
एकूण 338640 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 334986 फेरतपासणीचे 402 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 3252 नमुने होते.
आजपर्यंत एकूण 338640 अहवाल प्राप्त झाले
आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 295345 आहे, अशी माहिती
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
शुन्य पॉझिटीव्ह
आज दिवसभरात आरटीपीसीआर व रॅपिडमध्ये
कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, अशी
माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.
एकाचा मृत्यू
वानखडे नगर, डाबकी रोड अकोला येथील 73 वर्षीय महिलेचा
उपाचारा दरम्यान मृत्यू झाला. तिला रुग्णालयात दि. 4 डिसेंबर रोजी दाखल केले होते,
अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयानकडून प्राप्त झाली.
आठ जणांवर
उपचार सुरु
जिल्ह्यात
एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 57906(43295+14434+177) आहे. त्यात 1141 मृत झाले आहेत. तर 56757
जणांना
डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत आठ जणांवर उपचार
सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय
महाविद्यालयातून देण्यात आली आहे.
रॅपिड ॲन्टीजेन चाचण्याः 128 चाचण्यात शुन्य पॉझिटीव्ह
कोरोना
संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.11) दिवसभरात झालेल्या 128 चाचण्या
झाल्या त्यात कुणाचाही अहवाल
पॉझिटीव्ह आला नाही, अशी माहिती
जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.
काल दिवसभरात
अकोट
येथे तीन, मुर्तिजापूर येथे 12, अकोला
महानगरपालिका येथे 98, जिल्हा आरोग्य कर्मचारीचे एक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 14
चाचण्या
झाल्या त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, असे एकूण 128 चाचण्यात कुणाचाही अहवाल
पॉझिटीव्ह आला नाही, असे जिल्हा रुग्णालयाने
कळविले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा