नागरिकांनी ‘दुसरा डोस’ प्राधान्याने घ्यावा; जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचे आवाहन

 अकोला, दि.21(जिमाका)- ओमायक्रॉनचा फैलाव रोखण्यासाठी लसीकरणाचे दोन्ही डोस पुर्ण करणे आवश्यक आहे. दुसरा डोसचा कालावधी पुर्ण झालेल्या नागरिकांनी प्राधान्याने मुदतीत लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे.

जिल्ह्यात 14 लक्ष 33 हजार लाभार्थ्यांना (१८ वर्षे वयावरील)  लस देण्याचे उद्दिष्ट आहे. जिल्हा प्रशासनातील सर्व यंत्रणांनी केलेल्या प्रयत्नांमुळे पहिला डोस आतापर्यंत 10 लक्ष 95 हजार 320 नागरिकांनी म्हणजेच 76.44 टक्के लोकांनी घेतला आहे. तर 5 लक्ष  56 हजार 661  व्यक्तिंनी  म्हणजेच 38.85 टक्के लोकांनी दुसरा डोस घेतला आहे, अशी माहिती लसीकरण मोहिमेचे समन्वयक डॉ.मनिष शर्मा यांनी दिली आहे.

 जिल्ह्यात परदेशात आलेला व्यक्तीचा आरटीपीसीआ  चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला असून सतर्कता म्हणून आरोग्य विभागाने  आरएनए नमुना ओमीक्रान तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले आहे. ओमायक्रॉनचा फैलाव लक्षात घेता लसीकरणाचे दोन्ही डोस पुर्ण करणे आवश्यक आहे.  दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तिंची संख्या ८० टक्के झाल्यास ओमायक्रॉनच्या संसर्गाचा धोका कमी असेल. ज्या व्यक्तिंना ओमायक्रॉनचा संसर्ग झाल्याचे निदर्शनास आले त्या व्यक्तिंचे लसीकरण झालेले नव्हते, अशी त्यांची वैद्यकीय पार्श्वभुमि सांगते, त्यामुळे लसीकरण झाल्यास संभाव्य तिसरी लाट आपण थोपवू शकतो,असेही डॉ. शर्मा यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यात १०० ठिकाणी लसीकरण सुविधा उपलब्ध राहणार असून त्यात प्राधान्याने दुसरा डोसकरिता विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाकडे कोविडच्या लसींची मात्राही मोठया प्रमाणात उपलब्ध आहे, अशी माहितीही आरोग्य यंत्रणेकडून देण्यात आली आहे.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ