बार्शीटाकळी येथील शासकीय वसतीगृहात मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्रवेश सुरु;

 


अकोला,दि.13(जिमाका)-सामाजीक न्याय विभागांतर्गत असलेले बार्शीटाकळी येथील शासकीय वसतीगृहात मागासवर्गीय मुलांचे प्रवेश सुरु झाले आहे. शासकीय वसतीगृहात प्रवेशाकरीता मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी वर्ग आठवी ते पदवी पर्यंत शिक्षण घेत असलेले तसेच बाहेर गावच्या  विद्यार्थ्यांना टक्केवारीनुसार व शासनाच्या निर्देशाप्रमाणे वसतीगृहात रिक्त असलेल्या जागेवर मोफत प्रवेश देणे सुरू आहे. वसतीगृहामध्ये विद्यार्थ्यांना राहण्याची जेवणाची मोफत सुविधा पुरविण्यात येईल. तसेच स्टेशनरी भत्ता, गणवेश भत्ता व मासीक निर्वाह भत्ता दिल्या जाईल. मागासवर्गीय विद्यार्थ्यांने ऑफलाईन अर्ज सोमवार दि. 20 डिसेंबरर्यंत करावे, असे आवाहन बार्शीटाकळी येथील मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृहाचे गृहपाल यांनी केले.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ