गारपीट, अवकाळी पाऊस यामुळे शेतात पिकांच्या झालेल्या नुकसानीबाबत विमा कंपनीला सुचना देतांना शेतकऱ्यांसाठी उपलब्ध पर्याय

 अकोला, दि.२९(जिमाका)-   राज्यात गेल्या दोन दिवसांत काही ठिकाणी गारपीट, अवेळी पाऊस यामुळे खरीप हंगामातील उभ्या असलेल्या तूर,कापूस तर काही प्रमाणात काढणी  झालेल्या तुरीचे नुकसान झाले आहे. या संदर्भात विमा संरक्षित पिकांच्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांनी ७२ तासांच्या आत विमा कंपनीस माहिती देणे आवश्यक असल्याने शेतकऱ्यांनी खालील पैकी कोणत्याही एका पर्यायाचा वापर सुचना देण्यासाठी करावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

त्यात,

. क्रॉप इन्शुरन्स ॲप (Crop Insurance App)

. विमा कंपनी टोल फ्री क्रमांक

     . विमा कंपनीचा ई-मेल 

     . विमा कंपनीचे तालुकास्तरीय कार्यालय 

     . कृषी विभागाचे मंडल कृषी अधिकारी कार्यालय 

     . ज्या बँकेत विमा जमा केला ती बँक शाखा 

 या पैकी कोणत्याही एका माध्यमाद्वारे झालेल्या नुकसानीची माहिती आपल्या संबंधित विमा कंपनीकडे करता येईल.

 या अवकाळी पाऊस व गारपीटीत रब्बी हंगामात विमा संरक्षित गहू, हरभरा, रब्बी ज्वारी यासारख्या पिकांचे देखील नुकसान झाले आहे. याबाबत अधिसूचित महसूल मंडळातील विमाधारक शेतकऱ्यांनी संबंधित विमा कंपनीस घटना घडल्यापासून ७२ तासाच्या आत नुकसानीबाबत सूचना देणे आवश्यक असल्यामुळे, याबाबतची पूर्वसूचना (intimation) आपल्या संबंधित विमा कंपनी यांना देण्याकरता वर दिल्याप्रमाणे पर्यायांचा वापर करता येईल. तरी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी  घटना घडल्यापासून ७२ तासाच्या आत आपल्या विमा संरक्षित पिकाचे नुकसान झाले असल्यास याबाबतची पूर्वसूचना (intimation) आपल्या संबंधित विमा कंपनीकडे विहित कालमर्यादेत सादर करावी असे कृषी विभागामार्फत आवाहन करण्यात आले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम