आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिन; हक्कासोबत कर्तव्याची जाणीव ठेवा




अकोला,दि.10 (जिमाका) - प्रत्येकाने आपल्या हक्का सोबत कर्तव्याची जाणीव  ठेवावी. कर्तव्याच्या जाणीवा शिवाय हक्काचे पालन होवू शकत नाही, असे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी केले. आंतरराष्ट्रीय मानवी हक्कदिन आज शुक्रवार (दि. 10) रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात आयोजीत करण्यात आला त्यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.

या कार्यक्रमाला उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, विश्वनाथ घुगे,  प्रशासन अधिकारी सुप्रिया टवलारे, मानवधिकार वृत्त मासिकाचे मुख्य संपादक विजय कुमार गडलिंगे, बार असोसिएशनचे अध्यक्ष राजेश जाधव, उपाध्यक्ष ॲड. अनूप देशमुख, ॲड. प्रविण तायडे, जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिक्षक मिरा पागोरे, नितीन निंबुळकर, प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी  उपस्थित होते.   

प्रत्येक नागरिकांना मानवी हक्काची जाणीव असणे गरजेचे आहे. आपल्यावर झालेल्या अन्याय विरुद्ध  मानवी हक्क आयोगाकडे दाद मागावी. याकरीता शासनस्तरावर यत्रंणा कार्यरत आहे. मानवी हक्काचे माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याकरीता असे उपक्रम राबविणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी केले.

यावेळी विजय कुमार गडलिंगे व ॲड. राजेश जाधव यांनी मानवी हक्काचे महत्व व अधिकाराबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विधी अधिकारी संदिप ककांळे तर सुत्रसंचालन व उपस्थितांचे आभार गुणवत्ता विकास कक्षाचे समन्वयक गजानन महल्ले यांनी केले.

0000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ