अल्पसंख्याक हक्क दिन: स्वतःच्या हक्क रक्षणासाठी जागरुकतेने पुढे या-जिल्हाधिकारी निमा अरोरा

 अकोला, दि.१८ (जिमाका)- अल्पसंख्याकांनी आपल्या हक्कांबाबत जागरुक असले पाहिजे. मात्र स्वतःचा हक्क मिळवण्यासाठी तसेच आयुष्यात स्वतःला हवं ते मिळविण्यासाठी स्वतः जागरुक होऊन प्रत्येकाने पुढे यावे,असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आज येथे केले.

अल्पसंख्याक हक्क दिनानिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने  ‘अल्पसंख्याक यांना त्यांचे घटनात्मक व कायदेशीर हक्कांची जाणीव  या विषयावर व्याख्यानाचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात करण्यात आले होते.

            या कार्याक्रमाला कार्यक्रमाला जिल्हाधिकारी निमा अरोरा, मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार,निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, अधीक्षक मिरा पागोरे, जेष्ठ विधीज्ञ ॲड. मोहम्मद डोकाडिया,भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाअध्यक्ष पी.जे. वानखडे, सचिव डॉ. एम.आर.इंगळे, महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक अधिकारी कर्मचारी असोसिएशनचे अध्यक्ष सोहेल परवेज अली, सचिव अलिम देशमुख व ॲड. प्राचार्य सरफराज नवाज खान, अल्पसंख्याक सामाजिक संघटना फोरमचे जुबेर नदीम खान, श्रीमती सोमय्या अलि, आलिया मॅडम,  ॲड. नजीब शेख, अल्पसंख्याक शिक्षक संघटनेचे जव्वाद हुसेन आदी मान्यवर तसेच अल्पसंख्याक समुदायातील विविध संघटनांचे प्रतिनिधी. विद्यार्थी- विद्यार्थिनी उपस्थित होते.

आपल्या संबोधनात जिल्हाधिकारी अरोरा यांनी  सांगितले की, सर्व अल्पसंख्याक समुदाय आपल्या हक्कांबाबत जागरुक राहून आपले हक्क स्वतः मिळवू लागतील, अशा तऱ्हेने मुख्य प्रवाहात सामिल होतील त्यादृस्ह्टीने आपण प्रयत्न केले पाहि







जे. त्यासाठी शिक्षण हे सर्वात महत्त्वाचे आहे.  शिक्षणाद्वारे आपण हवं ते मिळवू शकतो. त्यासाठी आपण आपले हक्क स्वतः मिळविण्यास शिकले पाहिजे, त्यासाठी स्वतः पुढे आले पाहिजे. यासाठी निव्वळ बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीवर भर द्यावा,असे आवाहनही त्यांनी केले.

आपल्या भाषणात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांनी, समाजात सर्व घटकांनी एकजुटीने राहणे समाजाच्या प्रगतीसाठी आवश्यक असल्याचे प्रतिपादन करुन आपत्तीच्या प्रसंगी एकत्र येणाऱ्या अकोल्यातील सर्व समाज घटकांचे अभिनंदन केले.

सहभागी वक्त्यांनी  अल्पसंख्याक समुदायांच्या विकासासाठी शासनाने तयार केलेल्या योजना सर्व घटकांपर्यंत पोहोचविण्याबाबत प्रशासनाने तसेच अल्पसंख्याक समुदायातील सर्व घटकांनी मिळून प्रयत्न करावे, असे मत मांडले.

प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी केले तर सूत्रसंचालन शितल शर्मा यांनी केले. गजानन महल्ले यांनी उपस्थितांचे आभार मानले.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ