ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारीची पालकमंत्री कार्यालयाकडून तात्काळ दखल; विनाविलंब रस्ता दुरुस्ती

        





अकोला, दि.२७(जिमाका)-     जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या कार्यालयाने ज्येष्ठ नागरिकांच्या ‘द मिशन सेवा संस्था’ या संस्थेने केलेल्या तक्रारीची तात्काळ दखल घेऊन पाठपुरावा केला व विनाविलंब रस्त्याची दुरुस्ती झाली,असा अनुभव येथील आकृतीनगर परिसरातील नागरिकांना आला.

            राष्ट्रीय महामार्ग सहा येथील परियोजना कार्यालय, अमरावती रहाटगाव नाका यांच्याकडे ‘द मिशन’ या संस्थेने तक्रार केली होती. त्यानुसार, महामार्गालगत आकृतीनगर पासून एक किलोमिटर रस्त्याची अवस्था खराब झाली होती. याबाबत दि.२० रोजी पत्रव्यवहार केला होता. पालकमंत्री यांच्या अकोला येथील कार्यालयात पत्र दाखल झाल्यानंतर स्विय सहायक डॉ. दीपक ठाकरे यांनी  राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीद्वारे संवाद साधून  तक्रार प्राप्त झाल्याची माहिती दिली व पाठपुरावा केला. त्यानंतर लगेचच  शनिवार दि.२५ रोजी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली आणि लगेचच दुसऱ्या दिवशी रस्त्याची डागडुजी करुन रस्त्याचे काम पूर्ण झाले. याबाबत  द मिशन सेवा संस्थेचे महासचिव डॉ. व्ही. पी. चव्हाण , अजय सेंगर, रविंद्र भंसाली यांनी पालकमंत्री महोदयांच्या कार्यालयात येऊन आभार व्यक्त केले.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ