रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात 101 चाचण्या, दोन पॉझिटिव्ह
अकोला , दि. 31(जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या 101 चाचण्या झाल्या त्यात दोन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आले . अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली. आज दिवसभरात झालेल्या चाचण्या याप्रमाणे- अकोला ग्रामिण , अकोट, बार्शीटाकळी, पातूर , मुर्तिजापूर व तेल्हारा येथे चाचण्या झाल्या नाही, बाळापूर येथे 10 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आ ला, तसेच अकोला मनपा येथे चाचण्या झाल्या नाही , अकोला आयएमए येथे 25 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आ ला, 51 वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आ ला नाही , वैद्यकीय महाविद्यालय येथे 11 चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आ ला नाही , तर हेडगेवार लॅब येथे चार चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आ ला नाही , असे दिवसभरात 101 चाचण्यांमध्ये दोन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. तर...