पोस्ट्स

ऑगस्ट, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

संत रोहिदास महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

  संत रोहिदास महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन अकोला, दि. 30 : संत रोहिदास चर्मद्योग व चर्मकार विकास महामंडळातर्फे अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील (चांभार, डोहोर, होलार व मोची आदी) आर्थिकदृष्ट्या दुर्बल व दारिद्र्यरेषेखाली जीवन जगणाऱ्या व्यक्तींसाठी विविध योजना राबविण्यात येतात. त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक आर. आर. वटे यांनी केले आहे. महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती गजभिये यांच्या मार्गदर्शनानुसार ‘लिडकॉम आपल्या दारी ’ या संकल्पनेतून कार्यशाळा यापूर्वी घेण्यात आली आहे. महामंडळाच्या कर्ज योजनेची जिल्ह्यात अंमलबजावणी होत आहे. नुकतेच पाच लाभार्थ्यांना कर्जाचे धनादेशही जिल्हाधिका-यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. अशा योजनांचा अधिकाधिक पात्र व्यक्तींनी लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. महामंडळाचे अकोला येथील जिल्हा कार्यालय महसूल कॉलनीत असून, संपर्क क्रमांक (0724) 2450625 असा आहे. 000000

जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी लोकशाहीदिन

    जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी लोकशाहीदिन अकोला, दि. 30 : जिल्हास्तरीय लोकशाहीदिन व दिव्यांग लोकशाहीदिन दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित केला जातो. त्यानुसार जिल्हा लोकशाहीदिन जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवार, दि. 2 सप्टेंबर रोजी दु. 3 वा. होणार आहे, संबंधितांनी नोंद घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ०००

कीटकनाशक फवारणीबाबत मार्गदर्शनासाठी प्रचाररथाचा शुभारंभ

  कीटकनाशक फवारणीबाबत मार्गदर्शनासाठी प्रचाररथाचा शुभारंभ अकोला, दि. 29 : पीकांवर कीटकनाशकांची फवारणी करताना आवश्यक उपाययोजनांबाबत शेतक-यांना मार्गदर्शन करण्यासाठी कृषी विभागातर्फे प्रचाररथाचा शुभारंभ जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या हस्ते आज झाला. जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी, जिल्हा कृषीविकास अधिकारी मिलिंद जंजाळ, कृषी उपसंचालक ज्योती ठाकरे, मोहिम अधिकारी महेंद्र साल्के, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक सतीश दांडगे, ‘एफएमसी इंडिया’चे शुभम बढे आदी यावेळी उपस्थित होते. हा प्रचाररथ जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत फिरून शेतक-यांमध्ये जनजागृती करणार आहे. गावोगाव कार्यक्रमांद्वारे फवारणी प्रात्यक्षिक, उपाययोजनांची माहिती देण्यात येईल. त्याचप्रमाणे, संरक्षक कीटचे वाटप करण्यात येईल. उपाययोजनांबाबतची भित्तीपत्रके, फ्लेक्स गावोगाव लावले जाणार आहेत, अशी माहिती श्री. जंजाळ यांनी केले. ०००

‘ईव्हीएम सील’ ब्रेक झाल्याचे समाजमाध्यमांवरील ते वृत्त खोटे तथ्यहीन व निराधार पोस्टवर विश्वास ठेवू नये - जिल्हाधिकारी अजित कुंभार

‘ईव्हीएम सील’ ब्रेक झाल्याचे समाजमाध्यमांवरील ते वृत्त खोटे तथ्यहीन व निराधार पोस्टवर विश्वास ठेवू नये -           जिल्हाधिकारी अजित कुंभार अकोला दि. 29 :   जिल्ह्यातील ईव्हीएमची प्रथमस्तरीय तपासणी प्रक्रिया ही निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणालीचे काटेकोर पालन करुन पार पाडण्यात आली आहे.   तथापि,   समाजमाध्यमांवर   300 ईव्हीएमचे ‘पिंक सील’   ब्रेक   झाल्या चे खोटे वृत्त प्रसारित झाले आहे. अशा   तथ्य ही न व निराधार पोस्टवर विश्वास ठेवू नये ,   असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अजित कुंभार यांनी केले आहे. निराधार वृत्त प्रसारित केल्यास कारवाई करणार यापुढे अश्या प्रकारच्या तथ्यहिन व निराधार पोस्ट पसरविणा ऱ्या   व्यक्तीविरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल , असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.      अकोला शहरातील काही नाग रिकांना   व्हा ट्स अप सारख्या समाजमाध्यमांवर   पुढीलप्रमाणे मेसेज प्राप्त झाला :   लोकसभा निवडणुकीनंतर अकोला जि ल्ह्या तील   ईव्हीएम चे नुकतेच फर्स्ट लेव्हल चेकिंग ( एफएलसी)   झाले व त्यामध्ये जवळजवळ ३००   ईव्हीएम चे पिंक सिल ब्रेक झालेले आढळले.

विशेष संक्षिप्‍त पुनरीक्षण कार्यक्रम अंतिम मतदार याद्या शुक्रवारी प्रसिद्ध होणार जिल्ह्यात 27 हजार 153 मतदारांची वाढ

      विशेष संक्षिप्‍त पु नरी क्षण कार्यक्र म अंतिम मतदार याद्या शुक्रवारी प्रसिद्ध होणार                  जिल्ह्यात 27 हजार 153 मतदारांची वाढ अकोला, दि. 29 : निवडणूक आयोगाकडून एक जुलै 2024 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार याद्यांचा सुधारित विशेष संक्षिप्‍त पुन री क्षण कार्यक्रम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. त्यात मतदार याद्यांची अंतिम प्रसिद्धी उद्या दि. 30 ऑगस्ट रोजी होणार असून, या कार्यक्रमाद्वारे एकूण 27 हजार 153 मतदारांची वाढ झाली आहे. स्त्री मतदारांच्या संख्येत लक्षणीय वाढ                 प्रारुप व अंतिम मतदार याद्यांची तुलना करता अंतिम मतदार यादीमध्‍ये 9 हजार 662 पुरूष, तर 17 हजार 489 महिला व 2 तृतीयपंथी अशा 27 हजार 153 इतक्‍या मतदारांची वाढ झाली आहे. पुनरीक्षणात पुरुष मतदारांच्‍या तुलनेत स्‍त्री मतदारांची 7 हजार 827 ने अधिक नाव नोंदणी झाली . ही वाढ 2.27 टक्के इतकी आहे. पाच हजार 929 तरूण मतदार वाढले                 दि . 6 ऑगस्ट 2024 रोजी प्रसिध्‍द करण्‍यात आलेल्‍या प्रारुप मतदार यादीमध्‍ये एकूण 18 ते 19 वयोगटातील मतदारांची संख्‍या ही 26 हजार 616 इत

संकटग्रस्त बालकांच्या मदतीसाठी 1098 हेल्पलाईन

  संकटग्रस्त बालकांच्या मदतीसाठी 1098 हेल्पलाईन अकोला, दि. 28 : संकटात सापडलेल्या मुलांच्या मदतीसाठी 1098 ही चाईल्ड हेल्पलाईन सर्व दिवस चोवीस तास सुरू आहे. कुठेही बालक संकटात असल्याचे जाणवताच नागरिकांनी हेल्पलाईनचा वापर करून त्याला मदत करावी, असे आवाहन महिला व बालविकास आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले आहे. कोणत्याही प्रकारच्या अडचणीत, संकटात सापडलेल्या तसेच काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या शून्य ते अठरा वयोगटातील सर्व बालकांच्या त्वरित मदतीकरिता केंद्र व राज्याच्या महिला व बाल विकास विभागामार्फत चाईल्ड हेल्पलाईन सेवा १०९८ हा क्रमांक संपूर्ण महाराष्ट्रात   कार्यान्वित आहे.   या सेवेअंतर्गत संकटग्रस्त बालकांना २४x७   हेल्पलाईन सेवा उपलब्ध आहे. या सेवेचा लाभ बालक स्वतः घेवू शकते किंवा इतर कोणीही या सेवेद्वारे बालकाला मदत मिळवून देऊ शकतात. १०९८ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून संकटग्रस्त बालकांना मदत करावी, असे आवाहन महिला व बालविकास आयुक्त डॉ. नारनवरे यांनी केले आहे. ०००

युवा कार्य प्रशिक्षण योजनेत अकोला राज्यात आघाडीवर

  युवा कार्य प्रशिक्षण योजनेत अकोला राज्यात आघाडीवर अकोला, दि. 28 : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत शासकीय कार्यालयातील ऑनलाईन प्लेसमेंटमध्ये अकोला जिल्हा राज्यात आघाडीवर आहे. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 4 हजार 652 उमेदवारांची विविध शासकीय व खाजगी आस्थापनांमध्ये निवड झाली आहे.   योजनेत अकोला जिल्ह्यात 1 हजार 826 उमेदवार रुजू झाले आहेत. त्यापैकी 1 हजार 744 उमेदवार हे विविध शासकीय कार्यालयांमध्ये रुजू झाले आहेत. या योजनेचे कामकाज ऑनलाइन व ऑफलाईन पद्धतीने सुरू आहे. त्यात शासकीय कार्यालयांमध्ये झालेल्या उमेदवारांच्या ऑनलाईन प्लेसमेंटमध्ये अकोला जिल्हा राज्यात गत पंधरवड्यात सतत पहिल्या दोन क्रमांकांमध्ये राहिला असून, अधिकाधिक तरूणांना योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्न होत आहेत. याबाबत जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी खासगी व्यावसायिक, उद्योजकांची बैठक घेऊन 20 हून अधिक कर्मचारी असणा-या असणा-या आस्थापनांनी योजनेत नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे.   जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 4 हजार 652 उमेदवारांची विविध शासकीय व खाजगी आस्थापनांमध्ये निवड झाली असून त्यापैकी 1 हजार 826 उमेदवार कार्

शासकीय मूकबधिर विद्यालयात स्वयंपाकी मदतनीसाची भरती

  शासकीय मूकबधिर विद्यालयात स्वयंपाकी मदतनीसाची भरती अकोला, दि. 28 :   शासकीय मूकबधिर विद्यालयात स्वयंपाकी मदतनीस हे पद रोजंदारीवर भरण्यात येणार आहे.त्यासाठी इच्छूक उमेदवारांनी दि. 30 ऑगस्टपर्यंत अर्ज विद्यालयात द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. हे विद्यालय अकोला शहरातील मलकापूर परिसरातील महसूल कॉलनीत आहे.   पदाच्या अटी व शर्तीनुसार हे रोजंदारी स्वरूपाचे काम आहे. सा.बां.विभागाच्या रोजंदारी पत्रकानुसार दरमहा रोजंदारी 26 दिवसांसाठी व नियुक्ती 10 महिन्यांसाठी असेल. सदर पदावर दावा करणार नाही असे प्रतिज्ञापत्र द्यावे लागेल. वेतनाशिवाय अन्य कोणतेही आर्थिक लाभ देय नाहीत. इच्छूकांनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 00

बार्शिटाकळी तालुक्यात नऊ संस्था अवसायनात महिनाभरात आक्षेप दाखल करण्याचे आवाहन

    बार्शिटाकळी तालुक्यात नऊ संस्था अवसायनात महिनाभरात आक्षेप दाखल करण्याचे आवाहन अकोला, दि. 27 : बार्शिटाकळी येथील सहकारी संस्था सहायक निबंधकांकडून तालुक्यातील नऊ सहकारी संस्था अंतिम अवसायनात घेण्यात आलेल्या आहेत.   याबाबत सहायक निबंधकांनी दि. 20 ऑगस्ट रोजी आदेश निर्गमित केला. अवसायनाबाबत काही स्पष्टीकरण, हरकत, आक्षेप असल्यास एका महिन्यात म्हणणे सादर करावे अन्यथा नोंदणी रद्द होईल, असा इशारा सहायक निबंधक ए. एस. शास्त्री यांनी दिला आहे. बार्शिटाकळी येथील जनकल्याण कृषी विषयक सर्वसेवा उद्योग सहकारी संस्था, रेडवा येथील राजराजेश्वर अभिनव शेती विविध तंत्रज्ञान संगोपन व समृद्धी संस्था, खडकी येथील जय मुंगसाजी आदिवासी गृहनिर्माण संस्था, पिंजर येथील रोहिदास अनु. जाती गृहनिर्माण संस्था व संत सेवालाल मागास गृहनिर्माण सह. संस्था, बार्शिटाकळी येथील अलहिरा पार्क गृहनिर्माण सह. संस्था, महात्मा फुले दुधपूर्णा प्रकल्प अभिनव सहकारी संस्था, कासमार येथील अभिनव मागास गृहनिर्माण संस्था, टिटवन येथील जय विरसा अभिनव शेती विविध तंत्रज्ञान संगोपन व समृद्धी सहकारी संस्था आदी संस्था अवसायनात ठरविण्यात आ

सर्वोत्कृष्ट गणेशोत्सव स्पर्धेत जिल्ह्यातील अधिकाधिक मंडळांनी सहभागी व्हावे - जिल्हा प्रशासनाचे आवाहन

 अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत  सर्वोत्कृष्ट गणेशोत्सव स्पर्धेत जिल्ह्यातील  अधिकाधिक मंडळांनी सहभागी व्हावे  -        जिल्हा प्रशासनाचे आवाहन अकोला, दि. 27 : सांस्कृतिक कार्य विभागातर्फे, सन 2024 च्या गणेशोत्सवात सहभागी होणाऱ्या उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुररस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. राज्यातील पहिल्या तीन विजेत्या क्रमांकांना अनुक्रमे पाच लाख, अडीच लाख आणि एक लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व मंडळांनी सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेमध्ये दि. 31 ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करावा , असे आवाहन करण्यात आले आहे.               गणेशोत्सवास दिनांक 7 सप्टेंबर रोजी सुरुवात होत आहे. राज्य समितीकडे जिल्हास्तरीय निवड समिती मुंबई, मुंबई उपनगर, पुणे, ठाणे या 4 जिल्ह्यातून प्रत्येकी 3 आणि अन्य जिल्ह्यातून प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण 44 प्राप्त शिफारशींमधून गुणांकन आणि संबंधित कागदपत्रांच्या आधारे पहिल्या तीन विजेत्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची निवड केली जाणार आहे. तर उर्वरित 41 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास राज्य शासनाकडून प्रत्येकी 25 हजार रुपयांचे पारितोषिक व प्र

उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

  उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन   अकोला, दि. 27 : उत्कृष्ट शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना "डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार" व" डॉ. एस. आर. रंगनाथ उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक पुरस्कार" देण्यात येणार आहे. पुरस्कारासाठी इच्छुक असणारे ग्रंथालय, कार्यकर्ते व सेवक यांनी आपले विहित नमुन्यातील अर्ज आवश्‍यक कागदपत्रासह दि. 25 सप्टेंबरपर्यंत तीन प्रतीत जिल्हा ग्रंथालयाकडे पाठवावे, असे आवाहन ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी केले. सार्वजनिक ग्रंथालयांचा गुणात्मक विकास व्हावा, वाचन संस्कृती वृध्दिंगत करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने हा पुरस्कार देण्यात येणार आहे.   राज्यांतील शहरी व ग्रामीण विभागातील अ, ब, क, ड, वर्गातील उत्कृष्ट शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना अनुक्रमे रुपये १ लक्ष, ७५ हजार, ५० हजार व २५ हजार रुपये आणि सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र,   ग्रंथभेट देऊन गौरविण्यात येइल.   राज्यातील एक राज्यस्तरीय उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक यांना प्रत्येकी ५० हजार रुपये, तसेच महसूल विभागातील प्रत्येकी

होमगार्ड सदस्य नोंदणीच्या तारखांत बदल

    होमगार्ड सदस्य नोंदणीच्या तारखांत बदल अकोला, दि. 26 : पावसामुळे जिल्हा होमगार्ड सदस्य नोंदणीच्या तारखांत बदल झाला आहे. त्यामुळे संबंधित उमेदवारांनी सुधारित तारखांना उपस्थित राहण्याचे आवाहन होमगार्ड कार्यालयाचे केंद्र नायक राजेंद्र शेळके यांनी केले आहे. यापूर्वी 22 ते 28 ऑगस्ट दरम्यान उमेदवारांची चाचणी व कागदपत्र पडताळणी करण्यात येणार होती. आता 28   ते 31 ऑगस्ट दरम्यान या चाचणी होईल. अर्जदारांच्या अर्जाच्या क्रमांकांनुसार शारीरिक चाचणी व कागदपत्र पडताळणीच्या तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यानुसार सर्व पुरूष उमेदवारांची चाचणी दि. 28 ऑगस्ट (अर्ज क्र. 2797 ते 5644), दि. 29 ऑगस्ट ( क्र. 5645 ते 8555) आणि दि. 30 ऑगस्ट (क्र. 8556 ते 11415) होणार आहे.   सर्व महिला उमेदवारांची चाचणी दि. 31 ऑगस्ट रोजी होणार आहे. ही चाचणी पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर होणार असून, उमेदवारांना सकाळी 5 पासून हजर राहण्याच्या सूचना आहेत.   अतिवृष्टी किंवा प्रशासकीय, अपरिहार्य कारणास्तव चाचणीमध्ये बदल झाल्यास त्याची सूचना   maharashtracdhg.gov.in   या संकेतस्थळावर वेळोवेळी देण्यात येणार आहे. ०

मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना : खासगी आस्थापनांची कार्यशाळा योजनेत अधिकाधिक खासगी आस्थापनांनी नोंदणी करावी - जिल्हाधिकारी अजित कुंभार

  मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना : खासगी आस्थापनांची कार्यशाळा योजनेत अधिकाधिक खासगी आस्थापनांनी नोंदणी करावी -         जिल्हाधिकारी अजित कुंभार अकोला, दि. 26 : मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेत उमेदवारांना प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षणाद्वारे रोजगारक्षम करण्याचे उद्दिष्ट असून, खासगी आस्थापनांनाही मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे. त्यामुळे अधिकाधिक आस्थापनांनी या योजनेत नोंदणी करून लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले. खासगी आस्थापनाधारक, उद्योजकांची कार्यशाळा जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली नियोजनभवनात झाली, त्यावेळी ते बोलत होते. कौशल्य विकास सहायक आयुक्त प्रफुल्ल शेळके, कौशल्य विकास अधिकारी ग. प्र. बिटोडे, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक नयन सिन्हा, उद्योग संघटनेचे अध्यक्ष श्री. खंडेलवाल आदी यावेळी उपस्थित होते. नोंदणीची प्रक्रिया सुलभ केली जिल्हाधिकारी श्री. कुंभार म्हणाले की, योजनेत अकोला जिल्ह्यात विविध आस्थापनांसाठी साडेचार हजारहून अधिक उमेदवारांची निवड झाली आहे. उद्योगांनी महास्वयम पोर्टलवर नोंदणीसाठी प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे. अकोला जिल्ह्यातील वीसपेक्

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी साधला लखपती दिदींशी संवाद_ आर्थिक सक्षमतेबरोबर आत्मसन्मान मिळाल्याची लखपती दीदींची भावना

इमेज
  जळगाव,दि.२५ ऑगस्ट (जिमाका) - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज जळगाव येथे देशातील निवडक लखपती दीदिंशी शी संवाद साधला. लखपती दीदी योजनेमुळे त्यांच्या जीवनमानात झालेल्या बदलाविषयी त्यांनी संवादाच्या माध्यमातून जाणून घेतले. "लखपती दीदी योजनेमुळे महिला बचतगटांना मिळालेल्या आर्थिक, व्यावसायिक सहाय्य व प्रशिक्षणामुळे आम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम झालो. त्याचबरोबर आम्हाला आत्मसन्मान ही मिळाला."अशी भावना लखपती दीदींनी यावेळी व्यक्त केली. येथील प्राइम इंडस्ट्रियल पार्क मैदानावर झालेल्या लखपती दिदी संमेलनापूर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील निवडक अशा ८० लखपती दीदींशी संवाद साधला. या लखपती दिदी संवाद कार्यक्रमात देशातील वेगवेगळ्या राज्यांतील बॅंक सखी दिदी, ड्रोन दीदी, पशु दिदी, कृषी दिदी म्हणून नावारूपाला येऊन लखपती झालेल्या महिला उपस्थित होत्या. यावेळी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, राज्याचे ग्रामविकास, पंचायत र

मुख्यमंत्री वयोश्री योजना; शिबिरांना जिल्हाभरात मोठा प्रतिसाद रविवारीही ठिकठिकाणी विशेष शिबिर ज्येष्ठांनी ‘मुख्यमंत्री वयोश्री योजने’चा लाभ घ्यावा - जिल्हाधिकारी अजित कुंभार

इमेज
अकोला, दि. २४ : मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ अकोला जिल्ह्यातील अधिकाधिक ज्येष्ठ नागरिकांना करून देण्यासाठी प्रत्येक तालुका, मनपा व नगरपालिका स्तरावर आज आयोजिण्यात आलेल्या शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला असून, उद्या  रविवारी (२५ ऑगस्ट) ठिकठिकाणी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिराद्वारे विशेष शिबिरांच्या माध्यमातून विविध विभागांच्या समन्वयाने गरजूंच्या अर्जांची पूर्तता करून घेण्यात येत आहे. ज्येष्ठ नागरिकांनी अर्ज करून योजनेचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले आहे. सर्व तालुका, मनपा, नप स्तरावर शिबिराच्या कार्यवाहीसाठी तहसीलदार, गटविकास अधिकारी, नप मुख्याधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी व गृहपाल यांना जबाबदारी देण्यात आली आहे. शिबिरांचे आयोजन करून योजनेचे अर्ज ग्रामसेवक व तलाठी यांच्यामार्फत परिपूर्ण भरून घेण्यात येत आहेत. अर्जदाराला आवश्यक प्रमाणपत्र देण्यासाठी आरोग्य अधिकारी शिबिरात उपस्थित आहेत. अकोला मनपा स्तरावरही नागरी आरोग्य केंद्र व आयुष्यमान आरोग्य मंदिर, तसेच जिल्ह्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रावर वयोश्री योजनेचे अर्ज भरून घेण्यात येत आहेत

पद्म पुरस्कार 2025 साठी नामांकने सादर करण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2024

  पद्म पुरस्कार  2025  साठी नामांकने सादर करण्याची शेवटची तारीख  15  सप्टेंबर  2024 नवी दिल्ली , 22   : दरवर्षी  प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला  पद्म पुरस्कारांची घोषणा होत असते. ही प्रथा पुढे नेत यावर्षी ही पद्म पुरस्कारांची  नामांकने, केंद्रीय गृह मंत्रालयाने सादर करण्याचे आवाहन केले आहे. याबाबत प्रक्रिया 1 मे 2024 पासून प्रारंभ  झाली असून, नामांकने सादर करण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर  2024 आहे. पद्म पुरस्कारांसाठीचे नामांकने  ( https://awards.gov.in ).    या राष्ट्रीय पुरस्कार पोर्टवर ऑनलाईन सादर केली जातील   पद्मविभूषण ,  पद्मभूषण ,  आणि पद्मश्री हे देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असून ,  कला ,  साहित्य ,  शिक्षण ,  क्रीडा ,  आरोग्य ,  सामाजिक कार्य ,  विज्ञान आणि अभियांत्रिकी ,  सार्वजनिक सेवा ,  नागरी सेवा ,  व्यापार ,  औद्योगिकी अशा विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कामगिरीसाठी हे पुरस्कार दिले जातात. प्रत्येक भारतीय नागरिक ,  वंश ,  व्यवसाय ,  स्तर ,  किंवा लिंगाचा अपवाद न करता ,  या पुरस्कारांसाठी पात्र आहे.   सरकार सर्व नागरिकांना स्वत:चे नामांकन करण्यासाठी आणि इतर योग्य व्

पशुधन विभागातर्फे शनिवारी राष्ट्रीय पशुधन कार्यशाळा

इमेज
  पशुधन विभागातर्फे शनिवारी राष्ट्रीय पशुधन कार्यशाळा अकोला, दि. 23 ; पशुसंवर्धन विभागातर्फे राष्ट्रीय पशुधन अभियान प्रशिक्षण कार्यशाळा उद्या (24 ऑगस्ट) सकाळी 10 वा. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कमिटी हॉलमध्ये होणार आहे. जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या हस्ते कार्यशाळेचा शुभारंभ होईल. जि. प. सीईओ वैष्णवी बी. यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहतील.कार्यशाळेत तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून पशुधन अभियान, डीपीआऱ, ऑनलाईन अर्जपद्धती, पशुधन विमा, चारा व्यवस्थापन, मूरघास निर्मिती, शेळीपालन आदींबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. जिल्ह्यातील शेतकरी व पशुपालक बांधवांनी कार्यशाळेचा लाभ घेण्याचे आवाहन पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. जगदीश बुकतारे यांनी केले आहे. ०००

अल्पसंख्याक विद्यार्थीबहुल शाळांना अनुदान 15 सप्टेंबरपूर्वी प्रस्ताव पाठवा

   अल्पसंख्याक विद्यार्थीबहुल शाळांना अनुदान 15 सप्टेंबरपूर्वी प्रस्ताव पाठवा -जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन अकोला, दि. 23 : धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थीबहुल शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना पायाभूत सोयी-सुविधा पुरविण्यासाठी २ लाख रू. पर्यंत अनुदान दिले जाते. इच्छुक शाळांनी अनुदानासाठी प्रस्ताव दि. 15 सप्टेंबरपूर्वी द्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले आहे.             शासनमान्य खासगी अनुदानित, विनाअनुदानित, कायम विना अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगरपालिका, नगर परिषद शाळा व अपंग शाळांमध्ये सन 2024-25 या वर्षासाठी अनुदान वितरणासाठी प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. इच्छुक शाळांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन कार्यालय येथे दि. 15 सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.       शासनमान्यता प्राप्त खासगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, नगरपालिका, नगर परिषद शाळा, औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये अल्पसंख्याक समाजाचे (मुस्लिम, बौध्द, ख्रिश्चन, जैन, शीख, पारशी व ज्यू) किमान 70 टक्के विद्यार्थी शिकत असणे आवश्यक आहे. अपंगांच्या

बाळापूर व तेल्हारा तालुक्यातील गोशाळांना आवाहन

  बाळापूर व तेल्हारा तालुक्यातील गोशाळांना आवाहन अकोला, दि. 22 : गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजनेच्या लाभासाठी बाळापूर व तेल्हारा तालुक्यातील पात्र गोशाळांनी दि. 5 सप्टेंबरपूर्वी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. जगदीश बुकतारे यांनी केले आहे. पशुधनासाठी चारा, पाणी व निवा-याची सोय, वैरण उत्पादन कार्यक्रम राबविणे या योजनेचा हेतू आहे. गोशाळा नोंदणीकृत व मागील ३ वर्षाचे लेखापरीक्षण व अनुभव आवश्यक. वैरण उत्पादनासाठी व पशुधन संगोपनासाठी स्वमालकीची किंवा नोंदणीकृत भाडेपट्ट्याची किमान 5 एकर जागा आवश्यक. मागणी केलेल्या अनुदानाच्या किमान 10 टक्के खेळते भांडवल आवश्यक. अधिक माहितीसाठी पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती यांच्याशी संपर्क साधावा. ०००

महाराष्ट्र माझा’ छायाचित्र, रिल्स आणि लघुपट स्पर्धेचे आयोजन

 महाराष्ट्र माझा’ छायाचित्र, रिल्स आणि लघुपट स्पर्धेचे आयोजन                                                                           माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा उपक्रम अकोला दि. २३ : महाराष्ट्राच्या प्रगतीचे सचित्र आणि दृकश्राव्य माध्यमातून दर्शन घडावे यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने महाराष्ट्राचा प्राचीन, ऐतिहासिक वारसा आणि सरकारच्या विविध महत्त्वाच्या योजनांवर आधारित ‘महाराष्ट्र माझा’ छायाचित्र, रिल्स आणि लघुपट स्पर्धा आयोजित केली आहे. माहिती व जनसंपर्क संचालनालयामार्फत ही स्पर्धा जाहीर केली आहे. ‘महाराष्ट्र माझा’ या संकल्पनेवर आधारित महाराष्ट्राचे कृषी, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, जलसंधारण, जलसंपदा, पायाभूत सुविधा, आरोग्य, पर्यटन आणि पर्यावरण, वने आदी योजनांशी संबंधित छायाचित्र, रिल्स आणि लघुपट स्पर्धेसाठी पाठवता येतील. प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकासाठी निवड झालेल्या छायाचित्र, रिल्स आणि लघुपटांना अनुक्रमे २५ हजार रुपये, २० हजार रुपये आणि १५ हजार रुपयांचे पारितोषिक प्रदान केले जाणार असून, तीन हजार रुपयांची पंधरा उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात येणार आहेत. या स्पर

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत योजनेत वीज देयक शून्य जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा जिल्हाधिकारी अजित कुंभार

इमेज
  प्रधानमंत्री सूर्यघर मोफत योजनेत वीज देयक शून्य जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा         जिल्हाधिकारी अजित कुंभार   अकोला, दि. २२ :  प्रधानमंत्री सूर्यघर मोफत योजनेत जिल्ह्यातील 858 घराच्या छतांवर सौर पॅनेलच्या माध्यमातून वीज निर्मिती सुरू झाली आहे. वापराएवढी वीजनिर्मिती होत असल्याने त्यांचे वीज देयक शून्यापर्यंत कमी झाले आहे. या पर्यावरणपूरक योजनेचा जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले. जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली योजनेच्या समितीची बैठक गुरूवारी त्यांच्या दालनात झाली, त्यावेळी ते बोलत होते. जि. प. सीईओ बी. वैष्णवी, ‘महावितरण’च्या अधिक्षक अभियंता प्रतीक्षा शंभरकर, कार्यकारी अभियंते ज्ञानेश पानपाटील, जयंत पैकीने, गोरक्षनाथ सपकाळे यांच्यासह जिल्ह्यातील उपविभागीय अभियंते उपस्थित होते.       जिल्हाधिकारी श्री. कुंभार म्हणाले की,  ऊर्जा क्षेत्रात महत्वाचा विधायक बदल घडविणारी ही योजना आहे. जिल्ह्यात अधिकाधिक नागरिकांना त्याचा लाभ मिळावा. योजनेत ‘मॉडेल व्हिलेज’च्या दृष्टीने विविध गावांची पाहणी करावी. जिल्ह्यात