जिल्हा व तालुका न्यायालयांत ९ डिसेंबरला लोकअदालत
जिल्हा व तालुका न्यायालयांत ९ डिसेंबरला लोकअदालत अकोला, दि. ३० : राष्ट्रीय व राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या सूचनेनुसार प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीशांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा व सर्व तालुका न्यायालयांत राष्ट्रीय लोकअदालत दि. ९ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० ते ५.३० दरम्यान होणार आहे. त्यात दाखलपूर्व प्रकरणे व न्यायालयात प्रलंबित प्रकरणांची सुनावणी होईल. धनादेश अनादर प्रकरणे, बँकेची कर्ज वसुली प्रकरणे, कामगारांचे वाद, वीज, पाणी देयक प्रकरणे, आपसात तडजोड करता येण्याजोगी फौजदारी, वैवाहिक व इतर दिवाणी वाद आदी दाखलपूर्व प्रकरणांची सुनावणी होईल. त्याचप्रमाणे, बँक कर्जवसुली, धनादेश अनादर, अपघात भरपाई, वैवाहिक वाद, भूसंपादन, सेवाविषयक पगार, भत्ते, सेवानिवृत्ती आदी कायदेशीर प्रकरणे, महसूल प्रकरणे, भाडे, वहिवाटीचे हक्क, मनाई हुकूम, विशिष्ट पूर्वबंध, करार पूर्तता आदीसंबंधी न्यायालयात प्रलंबित प्रकरणांची सुनावणी होईल. असे होतात फायदे लोकन्यायालयाच्या निवाड्याविरुद्ध अपील नाही. एकाच निर्णयात कोर्टबाजीतून कायमची सुटका होते. साक्षी-पुरावे आदी बाबी टळून निकाल जलद लागतो. सामंजस्याने तोडगा निघाल्याने...