शासकीय व खाजगी आस्थापनांवरील कर्मचाऱ्यांची त्रैमासिक सांख्यिकी माहिती 31 जुलैपर्यंत सादर करा


          अकोला, दि.10(जिमाका)- जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय  खाजगी क्षेत्रातील कायद्यांतर्गत असणाऱ्या आस्‍थापनांनी त्‍याच्‍या आस्‍थापनेवर कार्यरत असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची जून अखेरचे त्रैमासिक विवरण नमुना ईआर-1 ची सांख्यिकी माहिती सोमवार दि. 31 जुलैपर्यंत ऑनलाईन पद्धतीने सादर करा, असे आवाहन  जिल्‍हा कौशल्‍य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त ठाकरे यांनी केले.

  सार्वजनिक तसेच खाजगी क्षेत्रातील सर्व आस्‍थापनांना सेवायोजन कार्यालये (रिक्‍तपदे सक्‍तीने अधिसुचित करणे) कायदा 1959 व नियम 1960 च्‍या कलम5(1) नुसार प्रत्‍येक तिमाहीस विहीत नमुना ईआर-1 मध्‍ये नियमीतपणे कौशल्‍य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्‍या www.mahaswayam.gov.in  या संकेतस्‍थळावरुन ऑनलाईन पध्‍दतीने सादर करणे बंधनकारक आहे. त्‍या अनुषंगाने जून 2023 अखेर संपणाऱ्या तिमाही नमुना ईआर-1 (ER-1) मधील त्रैमासिक सांख्यिकिय माहीती नोदणीकृत सर्व आस्‍थापनांनी यापुर्वी दिलेल्या युझर नेम व पासवर्डचा वापर करुन  www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्‍थळावर त्रैमासिक विवरण पत्र विहीत मुदतीत ऑनलाईन पध्‍दतीने सादर करावे. तसेच प्रत्‍येक आस्‍थापनेने आपला नोंदणी तपशील, आवश्‍यक  सर्व माहीती नोंदवून अद्यावत करावा. त्रैमासिक ईआर-1 किंवा आपला नोंदणी तपशील अद्यावत करतांना कोणत्‍याही प्रकारची अडचण आल्‍यास akolarojgar@gmail.com या ई-मेल आयडी किंवा जिल्‍हा कौशल्‍य विकास रोजगार व उद्योजकता कार्यालयाच्या दुरध्‍वनी क्रमांक 0724-2433849 अथवा 9665775778  या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ