जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथे बालस्नेही कक्षाची स्थापना


अकोला,दि.10(जिमाका)- पिडीत बालकांचे स्वतंत्र व दबाबरहित वातावरण मिळावे याकरीता जिल्हा विधी प्राधिकरण, अकोला येथे बालस्नेही कक्षाची स्थापना करण्यात आले. या कक्षाचे शुभारंभ प्रमुख जिल्हा व सत्र न्यायधिश एस.के. केवले यांच्या हस्ते आज करण्यात आले.

बालस्नेही कक्षाची स्थापना करण्याचे उद्देश पिडीत बालकांचे स्वतंत्र आणि दबावरहित वातावरणात फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 164 अन्वये जबाब नोंदविण्यासाठी केला जाईल. या ठिकाणी न्यायदंडाधिकारी स्वत: बालस्नेही कक्षात येऊन पिडीत बालकांचे जबाब नोंदविणार आहेत, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव योगेश पैठणकर यांनी दिली. उद्घाटन कार्यक्रमाच्या वेळी जिल्हा न्यायधीस ए.डी. क्षिरसागर, शयाना पाटील, एस.एम.पाटील, व्ही.बी. गव्हाणे, ए.के.काळे तसेच मुख्यालयातील सर्व न्यायाधीस, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ