अतिवृष्टीमुळे दोन घरांचे अशंत:नुकसान तर दहा वर्षीय मुलगा वाहून गेला


अकोला दि.13(जिमाका)-  जिल्ह्यात बुधवारी(दि.12) झालेल्या पावसामुळे मुर्तिजापूर तालुक्यातील दोन घरांचे अशंत: नुकसान झाले तर 10 वर्षाचा मुलगा रिझवान अहमद इकबाल अहमद कुरेशी, खैर महंमद प्लॉट, अकोला येथील हा लहान नाल्यामध्ये वाहुन गेला. या मुलाचे शोध व बचाव पथकाव्दारे शोध कार्य सुरु आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे संदिप साबळे  यांनी दिली.

            जिल्ह्यामध्ये बुधवारी(दि.12) सरासरी एकूण 45.7 एमएम पाऊसाची नोंद झाली. अकोला तालुक्यातील अकोला येथे 98.5 एमएम, कापशी येथे 95.8 एमएम, कौलखेड 83.5 एमएम.  बार्शीटाकळी तालुक्यातील बार्शीटाकळी येथे 88.8 एमएम तर राजंदा येथे 117.3 एमएम. बाळापूर तालुक्यातील व्याळा येथे 92 एमएम, वाडेगाव येथे 75 एमएम तर पातूर तालुक्यातील बाभुळगाव येथे 66.5 एमएम पावसाची नोंद झाली आहे.

            अतिवृष्टी व पुरामुळे वाहून गेलेला 10 वर्षीय मुलाचे शोध रात्रीपासून सुरु असून वाहून गेलेल्या नाल्यापासून ते मोर्णा नदीमध्ये शोध कार्य सुरु होते. आज (दि.13) दुपारपर्यंत सुकोडा, भोंड, सांगवी बाजार, हातरुन बोरगांव वैराळेपर्यंत शोध कार्य करण्यात आले. शोध कार्यामध्ये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाचे सुनिल कल्ले, हरीहर निमकंडे, वंदे मातरम शोध व बचाव पथकाचे उमेश आटोटे, मनिष मेश्राम, राजकुमार जामणिक, अग्रिशमन विभागाचे अधिकारी कर्मचारी व सदस्य शोध कार्यामध्ये प्रयत्न करीत आहे, अशी माहिती प्रशासनाव्दारे देण्यात आले.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ