बाल संरक्षण क्षेत्रातील स्वयंसेवी संस्थेतील प्रतिनिधीकडून अर्ज आमंत्रित


अकोला, दि.17(जिमाका)- जिल्ह्यात प्रतिपालकत्व, प्रायोजकत्व व अनुरक्षण या संस्थेत्तर सेवाच्या अंमलबजावणीसाठी   प्रतिपालकत्व व प्रायोजकत्व समिती स्थापन करण्यात येत असून महिला व बाल क्षेत्रात काम करणाऱ्या जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्थेच्या प्रतिनिधीनी शुक्रवार दि. 28 जुलैपर्यंत अर्ज करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे.  

            बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 व बाल न्याय मुलांची काळजी संरक्षण नियम 2018 नुसार प्रतिपालकत्व व प्रायोजकत्व योजनेनुसार समिती स्थापन करावयाची आहे. याकरीता जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मार्फत जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्थेतील एका प्रतिनीधीची निवड केली जाईल. महिला व बाल विकास क्षेत्रात काम करणाऱ्या व समाजकार्याची आवड असणाऱ्या स्वयंसेवी संस्थेच्या प्रतिनिधीची प्रतिपालकत्व व प्रायोजकत्व समितीवर विना मानधन तत्वावर एकाची निवड केली जाईल. इच्छुक व्यक्तीनी आपला अर्ज जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, पहिला माळा, प्रशासकिय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथे सादर करावे, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीमती मिना प्रधान यांनी केले आहे.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ