हवामान अंदाजः 21 जुलैपर्यंत पावसाची शक्यता


अकोला,दि.17(जिमाका)- हवामान विभाग, नागपूर यांच्या संदेशानुसार शुक्रवार (दि. 21जुलै) पर्यंतच्या कालावधीत जिल्ह्यामध्ये पाऊस येण्याची शक्यता वर्तविलेली आहे.

नदीकाठावरील गावातील नागरिकांनी नदी, नाले, ओढे इत्यादी ठिकाणी पाऊस सुरु असतांना किंवा पूर परिस्थिती असतांना पूर पाहण्यास गर्दी करु नये. पुलावरुन पाणी वाहत असतांना दुचाकीने किंवा प्रत्यक्ष जाण्याचे टाळावे. नागरिकांना आवश्यक ती दक्षता घेण्याच्या अनुषंगाने सतर्कतेचा इशारा देण्यात यावा. विजेपासून बचावाच्या अनुषंगाने आवश्यक दक्षता घ्यावी. झाडाखाली उभे राहू नये. अनुचित घटना टाळण्यासाठी पुर्णा, मोर्णा व इतरही लहान मोठ्या नदी नाल्यामध्ये पोहण्याचे धाडस करु नये. तसेच सर्व यंत्रणांनी योग्य ती दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ