संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ; शासनाच्या कर्ज योजनाचा लाभ घेण्याचे आवाहन


अकोला, दि.13(जिमाका)-  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातंर्गत कार्यरत असलेल्या संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत चर्मकार समाजासाठी (चांभार, ढोर, होलार, मोची इ.) विविध योजना राबविले जातात. चर्मकार समाजाचे शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकासासाठी विविध कर्ज योजना राबविण्यात जातात. तसेच केंद्र व राज्य शासनामार्फत एनएसएफडीसी योजना राबविली जातात. या शासकीय योजनाचा चर्मकार समाजानी लाभ घ्यावा, असे आवाहन संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळचे व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती गजभिये यांनी केले आहे.

एनएसएफडीसी नवी दिल्ली यांच्या मुदती कर्ज योजनेअंतर्गत स्मॉल बिझनेस 1 लाख, 1 लाख 50 हजार व 2 लाख रुपये, चर्मोद्योग 2 लाख, लघुऋण वित्त योजना व महिला समृद्धी योजना प्रत्येकी 50 हजार रुपये योजनांसाठी मागील प्रलंबित नस्तींकरिता 22.21 कोटी इतका निधी प्राप्त  झाला आहे. तसेच सन 2023-24 या आर्थिक वर्षात एनएसएफडीसीच्या मुदती कर्ज योजनेअंतर्गत स्मॉल बिझनेस 5 लाख रुपये, लघुऋण वित्त योजना व महिा समृद्धी  योजना प्रत्येकी 1 लाख 40 हजार रुपये तसेच नवीन महिला अधिकारीता योजना 5 लाख मंजूर झालेले आहेत.  एनएसएफडीसी शैक्षणिक कर्ज योजनेमध्ये वाढ झाली असून भारतामध्ये 20 लाख रुपये व विदेशामध्ये 30 लाखपर्यंत कर्ज मंजूर केल्या जातात. अधिक माहितीसाठी नजीकच्या महामंडाळाच्या जिल्हा कार्यालयास भेट द्यावी, असे कळविण्यात आले आहे.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ