प्रधानमंत्री पीक विमा योजना विमा; योजनेच्या अर्जात पिकांची बिनचूक माहिती द्यावी - जिल्हाधिका-यांचे आवाहन


अकोला, दि. 20 : प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अर्जात शेतकरी बांधवांनी पिकांची माहिती प्रत्यक्ष पे-यानुसार बिनचूक द्यावी. शेतात न पेरलेल्या पिकाचा उल्लेख केल्यास ‘क्लेम’ नाकारला जाऊ शकतो, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे.  

          प्रधानमंत्री पीक विमा योजना अकोला जिल्ह्यात एचडीएफसी ॲग्रो कंपनीमार्फत राबवली जात आहे. अर्जदारांकडून शेतात प्रत्यक्ष पेरणी न झालेल्या पिकांचेही उल्लेख अर्जात होत असल्याचे निदर्शनास आले आहे. तसे केल्यास ‘क्लेम’ नाकारला जाऊ शकतो. त्यामुळे यापूर्वी अर्ज केलेल्यांनी अर्जात चुकीचा उल्लेख केलेला असल्यास येत्या पाच दिवसांत पीएमएफबीवाय पोर्टलवर (pmfby.co.in) योग्य बदल करून घ्यावा व पीक पेरणीची बिनचूक माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले.

आधीच्या अर्जातील पीकाच्या उल्लेखात दुरूस्ती करण्यासाठी पोर्टलवर आधीचा अर्ज रिजेक्ट करण्याची विनंती करावी. त्यानंतर प्रत्यक्ष पेरलेल्या पीकाचा उल्लेख करून अर्ज करावा जेणेकरून विम्याचा लाभ मिळण्यापासून एकही पात्र व्यक्ती वंचित राहणार नाही, असे आवाहन करण्यात आले. अधिक माहितीसाठी सुनील भालेराव, जिल्हा व्यवस्थापक, एचडीएफसी ॲग्रो (भ्रमणध्वनी क्र. 9921250033), अकोला यांच्याशी संपर्क करावा. पीक विमा योजनेत अधिकाधिक शेतकरी बांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ