मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी ‘बीएलओ’ घेणार घरभेटी

 

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी ‘बीएलओ’ घेणार घरभेटी

जिल्हाधिका-यांचे नागरिकांना सहकार्याचे आवाहन

अकोला, दि. 19 :  मतदार यादी अद्ययावत व अचूक होण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) घरोघरी प्रत्यक्ष भेट देऊन मतदारांच्या तपशीलाची पडताळणी कुटुंबप्रमुखांकडून करून घेणार आहेत. त्यांना नागरिकांनी आवश्यक पूर्ण माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे.    

जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून दि. 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. पुनरीक्षण पूर्व उपक्रमात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी दि. 21 जुलै ते 21 ऑगस्ट या कालावधीत घरोघरी भेट देऊन मतदारयादीची पडताळणी करणार आहेत.

त्यात दि. 1 जानेवारी 2023 रोजी पात्र असूनही नोंदणी न केलेले मतदार, दि. 1 जानेवारी 2024 रोजी पात्र ठरतील असे संभाव्य मतदार, पुढील तीन अर्हता दिनांकावर पात्र ठरतील असे संभाव्य मतदार, त्याचप्रमाणे, एकापेक्षा अधिक नोंदी असल्यास, मयत मतदार, कायमस्वरूपी स्थलांतरित मतदार आदी आवश्यक नोंदी घेण्यात येतील.

मतदार यादीची पडताळणी करण्यासाठी आलेल्या अधिका-यांना नागरिकांनी सहकार्य करावे. कुटुंबातील सर्व मतदारांचा तपशील अचूक असल्याची खातरजमा करावी. नोंदीमध्ये दुरुस्ती असल्यास आवश्यक पुरावे द्यावेत. मतदार यादीत नाव असूनही अद्याप आधार क्रमांक संलग्न न केलेल्या मतदारांनी नमुना 6 (ब) ‘बीएलओं’कडे भरून द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती अरोरा यांनी केले आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ