जिल्हा विकास आराखड्याबाबत बैठक दीर्घकालीन विकासाच्या दृष्टीने परिपूर्ण आराखडा तयार करा - जिल्हाधिकारी निमा अरोरा





अकोला, दि. 21 : जिल्ह्यातील विकासाची बलस्थाने, उत्कर्षाच्या संधी,  संभाव्य अडचणी व आवश्यक उपाययोजनांचा अभ्यास करुन विविध क्षेत्रांचा समतोल विकास साधण्यासाठी जिल्ह्याचा विकास आराखडा लवकरात लवकर पूर्ण करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले.

आराखड्याबाबत बैठक जिल्हाधिका-यांच्या दालनात झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. उद्योग विभागाचे सहसंचालक सुरेश लोंढे हे ऑनलाईन व जिल्हा नियोजन अधिकारी गिरीश शास्त्री, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक नीलेश निकम यांच्यासह विविध विभागप्रमुख बैठकीला उपस्थित होते. 

 केंद्र शासनाने 2047 पर्यंत भारत विकसित देश करण्याचा संकल्प केला असून, त्यानुसार राज्य शासनानेही महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सन 2027 पर्यंत 1 ट्रिलीयन डॉलर, सन 2037 पर्यत 2.5 ट्रिलीयन डॉलर व सन 2047 पर्यंत 3.5 ट्रिलीयन डॉलरपर्यंत नेण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी विकासाचे केंद्र म्हणून जिल्ह्यांवर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. त्यासाठी स्थानिक नागरिकांच्या गरजा, जिल्ह्यांची वैशिष्ट्ये लक्षात घेऊन विकास आराखडा साकार होईल. 

जिल्हाधिकारी श्रीमती अरोरा म्हणाल्या की, जिल्ह्यातील साधारणत: 67 टक्के नागरिक हे शेतीव्यवसायात गुंतलेले आहेत. कृषी क्षेत्राचा विकास करण्यासाठी कृषी आधारित प्रक्रिया उद्योगांचा प्राधान्याने आराखड्यात समावेश व्हावा. शेतीपूरक उद्योगांना चालना देण्याबरोबरच विकासाच्या शक्यता असलेल्या इतरही क्षेत्रात गुंतवणूकीला चालना मिळू शकेल अशा संकल्पनांचा समावेश करावा.  

    या माध्यमातून जिल्ह्यात मल्टिमोडल लॉजिस्टिक्स पार्क, फूड क्लस्टर, टेक्स्टाईल क्लस्टर, रेशीम उद्योग विकसित करण्यात येईल. विकासाच्या बलस्थानांवर विशेष लक्ष देण्याचे व वर्षनिहाय प्रगती, सकल घरेलू उत्पादन (जीडीपी) व दरडोई उत्पन्नातील वाढ यांचाही समावेश करावा, असेही निर्देश त्यांनी दिले. सहायक जिल्हा नियोजन अधिकारी कैलास देशमुख, नॅशनल फेलो ऋग्वेद ऐनापुरे, विकास सल्लागार हेमंत जामोडे आदी यावेळी उपस्थित होते.

0000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ