आदिवासी मुला- मुलींचे शासकीय वसतीगृह; प्रवेश सुरु


अकोला दि.6(जिमाका):- आदिवासी मुलांचे व मुलींचे शासकीय वसतीगृह  क्रमांक  1 व 2 अकोला येथील रिक्त जागेवर प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे, असे वसतीगृहाचे गृहपालक यांनी कळविले आहे. या वसतीगृहात गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जातो. इयत्ता 11 वी, डिप्लोमा, पदवी, व्यावसायिक अभ्यासक्रम, पदव्युत्तर पदवी या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.  त्यासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. ऑनलाईन अर्ज www.swayam.mahaonline.gov.in  या संकेतस्थळावर अर्ज भरावा व अर्जाची प्रिंट व आवश्यक कागदपत्रे  वसतीगृहावर जमा करावे. त्यात बोनाफाईड सर्टिफिकेट, गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, बॅंक खाते पत्र, वैद्यकीय प्रमाण पत्र, आधार कार्ड तसेच ऑनलाईन भरलेल्या अर्जावर स्वतःचा व कुटुंबातील जबाबदार व्यक्तीचा मोबाईल क्रमांक नमूद करावा. विद्यार्थ्यांचे अर्ज आदिवासी मुलांचे वसतीगृह क्रमांक १, तोष्णिवाल ले आऊट, अकोला, आदिवासी मुलींचे शासकीय वसतीगृह क्रमांक २, दामले मार्केट, अकोला. आदिवासी मुलांचे शासकीय वसतीगृह जुने क्रमांक 1 कृषी नगर, अकोला व आदिवासी मुलांचे वसतीगृह नवीन क्रमांक २, कीर्ती नगर, अकोला येथे सादर करावे,असे आवाहन करण्यात आले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा