‘मनरेगा’बाबत तक्रार असल्यास रोहयो कक्षाकडे द्यावी

 ‘मनरेगा’बाबत तक्रार असल्यास रोहयो कक्षाकडे द्यावी

प्रशासनाचे आवाहन

अकोला, दि. 24 : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (मनरेगा) अंमलबजावणीबाबत कुठलीही तक्रार असल्यास नागरिकांनी ती रोहयो कक्षातील तक्रार निवारण प्राधिका-यांकडे द्यावी, असे आवाहन रोहयो कक्षातर्फे करण्यात आले आहे.

योजनेच्या अंमलबजावणीबाबत तक्रार निकाली काढण्यासाठी तक्रार निवारण प्राधिकारी हे पद रोहयो कक्षात नियुक्त आहे. त्यांच्याकडून तक्रारीबाबत सुनावणी घेऊन कार्यवाही करण्याची जबाबदारी पार पाडली जाते. तथापि, प्रशासनाला योजनेबाबत तक्रारी प्राप्त होत नाहीत, असे निदर्शनास आले आहे.  त्यामुळे ‘मनरेगा’बाबतची कुठलीही तक्रार नागरिकांनी प्राधिका-यांकडे दाखल करावी. त्याबाबत वेळीच सुनावणी घेऊन आवश्यक कार्यवाही केली जाईल, असे आवाहन रोहयो उपजिल्हाधिकारी विजय पाटील यांनी केले आहे.

रोहयो कक्षात तक्रार निवारण अधिकारी म्हणून रवींद्र अग्रवाल (मो. क्र. 9423428187) कार्यरत आहेत.

०००  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ