तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कारांसाठी 14 जुलैपर्यंत प्रस्ताव आमंत्रित


अकोला दि.7(जिमाका):- केंद्र शासनाव्दारे तेनझिंग नॉर्ग राष्ट्रीय साहसी पुरस्कार 2022 च्या नामांकनासाठी शुक्रवार दि. 14 जुलैपर्यंत ऑनलाईनव्दारे प्रस्ताव मागविण्यात आले आहे. इच्छुक व पात्र खेळाडूंनी आपला प्रस्ताव ऑनलाईन सादर करावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी सतीशचंद्र भट यांनी केले आहे.

            अटीशर्ती याप्रमाणे : नामांकन सादर करणाऱ्या खेळाडूंनी मागील तीन वर्षामधील 2020 ते 2022 या कालावधीतील सर्व कामगिरीबाबत माहिती देणे आवश्यक. साहसी उपक्रम हे जमिनीवरील, समुद्रावरील व हवेमधील असावे. खेडाळूंची कामगिरी अतिउत्कृष्ट असावी.  तेनझिंग नॉर्ग राष्ट्रीय साहसी पुरस्कार सन 2022 करीता नामांकने प्रस्ताव केंद्र शासनाच्या https://award.gov.in ऑनलाईन पोर्टलवर स्विकारण्यात येईल. उशिरा प्राप्त प्रस्तावांचा विचार केल्या जाणार नाही. ऑनलाईन पोर्टलव्दारे सादर केलेले प्रस्तावाची एक कॉपी कार्यालयाच्या ई-मेलवर akoladso@gmail.com तसेच एक प्रत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, वसंत देसाई स्टेडियम, अकोला येथे कार्यालयीन वेळेत सादर करावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ