पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारासाठी प्रस्ताव मागविले


        अकोला, दि. 24 (जिमाका):  महिला व बालविकास विभागामार्फत महिला व बाल विकास क्षेत्रात उत्कृष्ठ काम करणाऱ्या महिलांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार दिला जातो. त्याअनुषंगाने सन 2020-21 ते 2023-24 या कालावधीतील राज्य, विभागीय व जिल्हास्तरावरील पुरस्कारासाठी समाजसेविका व संस्थेकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहे. पात्र इच्छुक समाजसेविका व संस्थांनी आपला प्रस्ताव दि. 9 ऑगस्ट 2023 पर्यंत सादर करावा, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मिना प्रधान यांनी केले.

             राज्यस्तरीय पुरस्कार : महिला व बालविकास क्षेत्रात किमान 25 वर्षाचा सामाजिक कार्याचा अनुभव असावा. ज्या महिलांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार, दलित मित्र पुरस्कार, सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त झाला आहे त्या महिलांना तो पुरस्कार मिळाल्याचे पाच वर्षापर्यंत राज्यस्तरीय पुरस्कारासाठी पात्र राहणार नाही. पुरस्कारांचे स्वरुप रक्कम 1,00,001/- रुपये रोख, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ.

            विभागीय पुरस्कार : महिला व बालविकास क्षेत्रात संस्थेचे किमान 5 वर्ष कार्य असावे. नोंदणीकृत संस्थेस दलित मित्र पुरस्कार प्राप्त नसावा. संस्था राजकारणापासून अलिप्त असावा. तसेच तिचे कार्य व सेवा पक्ष व राजकारणापासून अलिप्त असावा. पुरस्कारांचे स्वरुप रक्कम 25,001/- रुपये रोख, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ.

            जिल्हास्तरीय पुरस्कार : महिला व बाल विकास क्षेत्रात किमान १० वर्ष कार्य केलेले असावे. ज्या महिलांना दलित पुरस्कार किंवा सावित्रीबाई फुले पुरस्कार मिळालेला आहे त्या महिलांना हा पुरस्कार अनुज्ञेय राहणार नाही. पुरस्कारांचे स्वरुप रक्कम 10,001/- रुपये रोख, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ.

          जिल्ह्यातील पात्र समाजसेविका व स्वयंसेवी संस्थांनी सन 2020-21, 2021-22, 2022-23  2023-24 या वर्षासाठीचे प्रस्ताव चार प्रतीत महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, पहिला माळा, अकोला येथे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी प्रधान यांनी केले.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ