शासकीय वसतीगृहातील महिलांचे आरोग्य तपासण्यासाठी महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा


अकोला, दि.14(जिमाका)-  येथील शासकीय महिला राज्यगृहातील महिलांच्या आरोग्य विषयक तपासण्या करण्यासाठी मासिक मानधनावर महिला वैद्यकीय अधिकारी आवश्यक आहे. त्याअनुषंगाने सामाजिक कार्य करणाऱ्या व आवड असणाऱ्या महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वसतीगृहात सेवा देण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन शासकीय महिला राज्यगृहाचे अधिक्षक गिरीश पुसदकर यांनी केले आहे.

शासकीय महिला राज्यगृह, स्मशनगृह रोड खडकी, अकोला येथे कार्यरत असून या संस्थेत 34 महिला वास्तव्यास आहे. या वसतीगृहातील महिलांचे आरोग्य तपासणीसाठी दर महिण्याला 12 भेटी द्यावे लागेल. वसतीगृहासाठी कार्य करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी यांना शासनाच्या निकषाप्रमाणे मानधन दिल्या जाईल. तरी महिलांकरीता कार्य करणाऱ्या महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वसतीगृहाकरीता सेवा द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम