सहकार विभागातील विविध पदांसाठी परिक्षा;ऑनलाईन अर्ज मागविले


अकोला दि.7(जिमाका):- सहकार आयुक्त व निबंधक, सहकार संस्था पुणे व अधिनस्त विभागीय सहनिबंधक तसेच सर्व विभागीय सहकारी संस्थेच्या कार्यालयांच्या आस्थापनेवरील विविध पदांसाठी सरळसेवेने स्पर्धा परिक्षा जाहिर झाली आहे.  यामध्ये गट क संवर्गातील सहकार अधिकारी श्रेणी-1, सहकार अधिकारी श्रेणी-2, लेखापरिक्षक श्रेणी-2,सहायक सहकारी अधिकारी/वरीष्ठ लिपीक, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्म श्रेणी लघुलेखक व लघुटंकलेखक या संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरीता स्पर्धा परिक्षा घेण्यात येणार आहे. भरती प्रक्रियेबाबतची सविस्तर तपशील सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, पुणे या कार्यालयाच्या https://sahakarayukta.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहे. शुक्रवार दि. 21 जुलैपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे, असे आवाहन सहकार संस्था पुणे सहकार आयुक्त व निबंधक यांनी केले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा