आदिवासी युवकांना विनामूल्य स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण

अकोला, दि. 20 :  अचलपूर येथील कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्रातर्फे आदिवासी युवकांना स्पर्धा परीक्षेचे विनामूल्य प्रशिक्षण दिले जाते. त्यासाठी दि. 26 जुलैपूर्वी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 प्रशिक्षण कालावधी 1 ऑगस्ट ते 15 नोव्हेंबर 2023 असा आहे. प्रशिक्षणार्थींना दरमहा एक हजार रू. विद्यावेतन मिळेल. प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर विविध विषयांच्या चार पुस्तकांचा संचही दिला जातो. उमेदवार अनुसूचित जमातीतील असावा. त्याचे वय 18 ते 30 दरम्यान असावे. किमान दहावी उत्तीर्ण असावा. त्याची रोजगार मार्गदर्शन केंद्रात नोंदणी झालेली असावी. अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला, एसडीओ यांनी दिलेले जात प्रमाणपत्र, दहावी उत्तीर्ण गुणपत्रिका, रोजगार नोंदणी प्रमाणपत्र जोडावे.  

 इच्छूकांनी आपला अर्ज मोबाईल क्र., आधार क्र., जात प्रवर्ग, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे ऑनलाईन कार्ड, एक पासपोर्ट साईज फोटो आदी तपशीलासह दि. 26 जुलैपर्यंत अचलपूर येथील कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्राकडे (संपर्क दूरध्वनी : 07223-221205) सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

००० 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ