मागासवर्ग आयोगाचा दि. 8 ऑगस्टला जनसुनावणी कार्यक्रम

मागासवर्ग आयोगाचा दि. 8 ऑगस्टला जनसुनावणी कार्यक्रम

अकोला, दि. 31 : राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य अकोला येथे दि. 8 ऑगस्ट रोजी भेट देणार असून, त्यांच्या उपस्थितीत जनसुनावणी, क्षेत्रपाहणी व विविध बाबींचा बैठकांद्वारे आढावा घेतला जाईल.

        आयोगाचे सदस्य सेवानिवृत्त न्यायाधीश चंद्रलाल मेश्राम, डॉ. गजानन खराटे, डॉ. निलिमा सरप (लखाडे), डॉ. गोविंद हरिबा काळे, लक्ष्मण हाके, ज्योतिराम चव्हाण आदी दौ-यात उपस्थित असतील.

त्यांचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे:  दि. 8 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी  10.30 ते 12.30  वा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प., शिक्षणाधिकारी (माध्यमिक व प्राथमिक) यांच्यासोबत प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संवर्गाच्या  इतर  मागासवर्ग  बिंदुनामावली व जिल्हा बदलीबाबत  बैठक व चर्चा, तसेच जिल्हा  जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांची आढावा बैठक.  

 

                 दुपारी 12.30 ते 1.30  वाजता  तेलंगी समाज  जनसुनावणी, सकल धनगर समाज जनसुनावणी, दु. 2 वाजता मलकापूरकडे (अकोला) रवाना,  दु. 2.30 ते 5  वाजता मलकापूर हडगर समाज क्षेत्र पाहणी, सायं. 5 वा. अमरावतीकडे रवाना.

००० 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ